Foods With More Protein Than Eggs : सतत ऊर्जावान राहण्यासाठी शरीराला प्रोटीनची खूप आवश्यकता असते. त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक जण शरीरातील प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंड्यांवर अवलंबून असतात. पण, तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, अंड्यापेक्षा आणखीन बरेच वेगेवेगळे आहार शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतात. म्हणून, दी इंडियन एक्स्प्रेसने पोषणतज्ज्ञांना असे २० पदार्थ विचारले, ज्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रथिने असतात.
अंडी प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात. कारण- त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अमिनो आम्ले असतात; जी शरीराला पचनासाठी उपयोगी पडतात. एका अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात, जे प्रामुख्याने अंड्याच्या पांढऱ्या भागात असतात. पण, अंडी पौष्टिक असली तरी अन्नपदार्थांमध्ये अंड्यांमध्ये जास्त प्रथिने असतात. जर आपण १०० ग्रॅममध्ये किती प्रथिने असतात हे मोजलं तर कदाचित काही पदार्थ वरचढ ठरू शकतील, असे हैदराबादमधील लकडी का पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर भावना पी. म्हणाल्या आहेत.
उदाहरणार्थ- चिकन , मासे, पनीर (कॉटेज चीज), सोया चंक्स व मसूर डाळ जास्त प्रथिने देतात. प्रति १०० ग्रॅम प्रमाणे मोजलं, तर ५० ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने सोया चंक्समध्ये असतात, ज्यामुळे ते वनस्पतीजन्य पॉवरहाऊस ठरते. त्याचप्रमाणे ग्रील्ड चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे ३० ग्रॅम प्रथिने असतात. ग्रीक दही आणि पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचे अतिरिक्त फायदेदेखील असतात.
पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून, प्रथिनांची गुणवत्तेचे प्रमाण संतुलित करणे आवश्यक आहे. डॉक्टर भावना म्हणाल्या की, अंडी प्रथिने देतात. पण, त्यांच्यामध्ये नेहमीच प्रथिनांचे प्रमाण जास्त असू शकत नाही. वनस्पतीजन्य (डाळ, कडधान्ये) तर प्राणीजन्य (मांस, अंडी, मासे) अशा वेगवेगळ्या प्रथिनांच्या स्रोतांना एकत्र खाल्ल्यास शरीराला आवश्यक ती प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. पण, वैयक्तिक आरोग्य, वय आणि जीवनशैलीनुसार प्रथिनांचे सेवन करण्यासाठी पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल .
प्रति १०० ग्रॅम नुसार अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने कोणत्या पदार्थांमध्ये असतात?
१. मूग डाळ (हिरवे मूग) – ही डाळ पचनास मदत करून पोटासाठी सौम्य असते. त्यामध्ये २४ ग्रॅम प्रथिने असतात.
२. मसूर डाळ (लाल मसूर) – हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या मसूर डाळीत कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामध्ये २६ ग्रॅम प्रथिने असतात.
३. तूरडाळ – २२ ग्रॅम प्रथिने असणारी ही डाळ ऊर्जा वाढवते आणि स्नायूंच्या देखभालीला मदत करते.
४. चणा डाळ – वजन व्यवस्थापनास मदत मदत करून पोट भरल्याची भावना प्रदान करतात,. त्यामध्ये २२ ग्रॅम प्रथिने असतात.
५. राजमा – राजमा रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवून, आतड्यांच्या आरोग्याला मदत करतात. त्यामध्ये ८.७ ग्रॅम प्रथिने असतात.
६. काळे चणे – काळ्या चण्यांतील २० ग्रॅम प्रथिने शरीराची आणि स्नायूंची ताकद वाढविण्यास मदत करतात.
७. काबुली चणे (पांढरे चणे) – काबुली चण्यांमध्ये २० ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे पचनासह रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास मदत होते.
८. सोयाबीन – हाडांच्या घनतेला मदत करणारे वनस्पतीजन्य पॉवरहाऊस. त्यामध्ये ३६ ते ४० ग्रॅम प्रथिने असतात.
९. पनीर (कॉटेज चीज) – पनीरमधील २५ ग्रॅम प्रथिने हाडे मजबूत करून, स्नायूंच्या पुनर्प्राप्तीला मदत करतात.
१०. दही – आतड्यांतील रोगप्रतिकार शक्ती सुधारते. साध्या दह्यात सुमारे ३.५ ग्रॅम प्रथिने असतात आणि कमी चरबीयुक्त दहीमध्ये सुमारे ६ ग्रॅम प्रथिने असतात.
११. ताक – ताक शरीराला थंड ठेवते आणि पचनास मदत करते. त्यात ७.८ ग्रॅम प्रथिने असतात.
१२. शेंगदाणे – शेंगदाणे खाल्ल्यास ऊर्जा पातळी टिकून राहते आणि त्यामध्ये २५.८ ग्रॅम प्रथिने असतात.
१३. बदाम – मेंदूचे कार्य आणि त्वचेचे आरोग्य वाढवते. त्यात २१.२ ग्रॅम प्रथिने असतात.
१४. काजू – मज्जातंतूंचे कार्य वाढवते आणि एक चांगला ऊर्जा स्रोत प्रदान करते. त्यामध्ये २४ ग्रॅम प्रथिने असतात.
१५. भोपळ्याच्या बिया – झोपेला मदत करतात आणि जळजळ कमी करतात. त्यात २९.८४ ग्रॅम प्रथिने असतात.
१६. राजगिरा – राजगिरा ग्लुटेनमुक्त असतो. त्यामध्ये हाडांची ताकद सुधारण्याची क्षमता असते, ज्यामध्ये १४ ग्रॅम प्रथिने असतात.
१७. बाजरी – सहनशक्ती वाढवते, हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते. त्यामध्ये १२.९ ग्रॅम प्रथिने असतात.
१८. नाचणी – पोट भरल्यासारखं वाटते आणि हाडांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरते. त्यात ७.३० ग्रॅम प्रथिने असतात.
१९. हरभरा – प्रथिने आणि फायबरने समृद्ध हरभऱ्यामध्ये चयापचय वाढवणारे अनेक पौष्टिक फायदे आहेत. त्यामध्ये २२ ग्रॅम प्रथिने असतात.
२०. वाटाणे – प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे; ज्यामध्ये ६.९ ग्रॅम प्रथिने असतात.