Premium

रोज कढीपत्ता खा, झटपट वजन घटवा; डॉक्टरांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

दररोज कढीपत्ता खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील याबाबत हेल्थ एक्सपर्टचे काय मत आहे जाणून घेऊ…

what happens if you have curry leaves everyday
रोज कढीपत्ता खा, झटपट वजन घटवा; आहारतज्ज्ञांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे (photo – freepik)

निरोगी जीवनशैली आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय शोधत असतात. यात कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्याला विशेष सुगंध आणि चव आहे; यामुळे कढी, सांबर, वरण यांसारख्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते. तसेच पाचक प्रणाली सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. अशा परिस्थितीत दररोज कढीपत्ता खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील, याविषयी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर

डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, कढीपत्ता खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. शिवाय चयापचयाच्या क्षमतेत वाढ होते. कढीपत्त्यात असलेल्या कार्बाझोल अल्कलॉइड्समध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. वजन कमी करण्याबरोबरच कढीपत्त्याची पानं पचन सुधारणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर मानली जातात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What happens body chew have curry leaves every day benefits sjr

First published on: 29-11-2023 at 18:51 IST
Next Story
डिझायनर रोहित बाल हृदय बंद पडल्याने व्हेंटिलेटरवर; अशी स्थिती का उद्भवते, प्राथमिक लक्षणे कशी ओळखाल?