भारतात करोना व्हायरसचा धोका पुन्हा वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात करोनाचे २१०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा सुमारे ५ महिन्यानंतरचा उच्चांक आहे. काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य परिस्थिती बिघडण्याची शक्यता बळावली आहे. रुग्णसंख्या जशी वाढतेय तशी लोकांच्या मनात भीती वाढत आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने आवश्यकती पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. WHO ने लसीकरणाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

WHO ने म्हटले की, निरोगी मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांना धोका कमी आहे. परंतु वृद्ध, उच्च-जोखीम गटांतील लोकांना करोनाचा धोका वाढतोय, त्यामुळे त्यांना करोनाविरोधी लसीच्या बूस्टर डोसनंतर ६ ते १२ महिन्यांनी पुन्हा एक डोस देण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वय आणि रोगप्रतिकारशक्ती लक्षात घेता ही शिफारस केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या शिफारशीनुसार, करोनाने मृत्यू होण्याचा आणि गंभीर आजारांचा सर्वाधिक धोका असलेल्यांना यात प्राधान्य दिले आहे. यात WHO ने करोनाविरोधी लसीकरणासाठी उच्च, मध्यम आणि कमी अशा तीन गट तयार केले आहेत.

यातील उच्च प्राधान्य गटात वृद्ध, गंभीर आजरी रुग्ण आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांचा समावेश आहे. या लोकांना लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर ६ ते १२ महिन्यांनी आणखी एक बूस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे. या गटातील लोकांचे वय आणि रोगप्रतिकारशक्ती लक्षात घेऊन लसीचा हा बूस्टर डोस दिला जाईल.

मध्यम प्राधान्य गटात निरोगी व्यक्ती, आजारी मुलं आणि १८ वयोगटावरील किशोरवयीन मुलांचा समावेश होतो. WHO ने मध्यम प्राधान्य गटासाठी प्रथम बूस्टर डोसची शिफारस केली आहे. त्यानंतर अतिरिक्त बूस्टर डोसची शिफारस केली आहे.

६ महिने ते १७ वर्षे वयोगटाखालील निरोगी मुलं कमी प्राधान्य गटातील आहेत, या गटातील मुलांना बूस्टर देण्यापूर्वी रोगाची तीव्रता समजून घेण्याचे आवाहन केले आहे. करोनाविरोधी लस आणि बूस्टर डोस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित आहेत, मात्र यात इतरही गोष्टींचा विचार केला जाणार आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who revises covid 19 vaccine recommendations for increased corona patients sjr