१६ तासांच्या इंटरमिटेंट फास्टिंगनंतर, मुख्यतः उच्च फायबरयुक्त पदार्थ आहाराचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. विशेषतः सकाळी फायबरचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे. इन्स्टाग्रामवर माहिती देताना टीव्ही होस्ट मिनी माथूर यांनी त्यांचा आहार आणि फिटनेसबद्दल अत्यंत दक्ष असल्याचे सांगितले. पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, “१६ तासांच्या इंटरमिटेंट फास्टिंगनंतर त्या प्रथम फायबरचे सेवन करतात, ज्यामध्ये सर्व प्रकारचे सॅलेड, स्ट्रॉबेरी, अंजीर, मोड आलेले कडधान्य, ब्लूबेरी, अननस, एक अंडे असते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, पोषणतज्ज्ञ अपूर्वा अग्रवाल यांनी सांगितले की, “फायबरयुक्त आहार घेतल्यास तृप्ततेची आणि परिपूर्ण आहार घेतल्याची भावना निर्माण करते, ज्यामुळे तुमची दिवसभर भूक नियंत्रित राहते. उत्तम फायबरयुक्त आहार घेऊन उपवास सोडल्यामुळे तुम्हाला इंटरमिटेंट फास्टिंगनंतर दिवसभरात अति आहाराचे सेवन करणे टाळता येते, जे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणारे किंवा कमी कॅलरी आहाराचे सेवन करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.”

आतड्यांचे आरोग्य जपण्यासाठी फायबर आवश्यक आहे. अग्रवाल सांगतात की, ” फायबर निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोटाला (gut microbiota) प्रोत्साहन देते, आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि बद्धकोष्ठता टाळते. उपवासानंतर, जेव्हा पचनसंस्थेला पुन्हा अन्नाच्या सेवनाशी आणि पचनक्रियेसह जुळवून घेण्याची गरज असते, तेव्हा उच्च फायबरयुक्त आहार पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.”

हेही वाचा – रताळे, पपई, संत्री आणि गाजर यांच्यात काय साम्य आहे, जो त्यांना सुपरफूड बनवतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर

“सकाळी सर्वप्रथम फायबर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. कारण फायबर साखर शोषून घेण्याचा दर कमी करतो. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अधिक स्थिर होते. “हे रक्तातील साखरेची पातळी जलद वाढणे आणि कमी होणे टाळण्यास मदत करते. याशिवाय उच्च फायबरयुक्त आहार पचनक्रियेमध्ये चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊन आतड्याचे आरोग्य जपते”, असे धरमशीला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

अग्रवाल यांनी स्पष्ट केले की,” नाश्त्यासाठी फायबरचे उच्च पोषक घटक असलेले पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. तुमच्या सकाळच्या जेवणात सुका मेवा, फळे, भाज्या यांचा समावेश करा. हे पदार्थ विविध जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर देऊन आरोग्य सुधारतात.”

हेही वाचा – हिवाळ्यात रोज लिंबू-मध पाणी प्यावे की नाही? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

याबाबत शर्मा यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की,”फायबरचे सेवन वाढविण्यासाठी एखाद्याने नाश्त्यामध्ये फळे, भाज्या आणि बियांचा समावेश करण्याचा विचार केला पाहिजे. हे पदार्थ आवश्यक पोषक तत्व देतातच, पण त्याचबरोबर संतुलित आहार घेतल्याचे समाधानदेखील देतात. तरीही, शरीरातील पाण्याची पातळी जपण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why take fiber first after 16 hours of intermittent fasting snk
First published on: 24-01-2024 at 18:17 IST