पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरात अंदाजे ६०–७५% पाणी असतं. मेंदू, हृदय, स्नायू, त्वचा या सर्वांच्या कार्यक्षमतेसाठी शरीरात पाण्याचं संतुलन महत्त्वाचं आहे. म्हणूनच पाणी पिणं खूप गरजेचं आहे. पुरेसं पाणी मिळालं, तर शरीर नीट काम करतं, आपल्याला ताकद मिळते आणि ताजेपणा वाटतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली, तर लगेच थकवा येतो, डोके दुखतं आणि अस्वस्थ वाटू लागतं. म्हणून दररोज पुरेसं पाणी पिणं हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.
निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणं ही कदाचित सर्वांत सोपी गोष्ट आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही पाणी कसे पिता हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे? पाणी पिताना ते लवकर गिळण्यापासून ते जेवणादरम्यान पाणी पिण्यापर्यंत आपण सर्व जण काही सामान्य चुका करतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांच्याशी बोलताना एक समग्र आरोग्य प्रशिक्षक यांनी सांगितले, “जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल, तुमचे इच्छित वजन गाठायचे असेल किंवा तुमच्या दिवसांत अधिक ऊर्जा मिळवायची असेल, तर पाणी पिताना या ४ चुका टाळा :
पाणी पिताना तुम्ही देखील या चार चुका करता का?
१. आपण पाणी खूप लवकर पिणे
जेव्हा तुम्ही घाईघाईत गटागट पाणी पिता तेव्हा शरीराला एक छोटासा धक्का बसतो. त्यामुळे शांतपणे एक-एक घोट पाणी प्या. पाणी गिळण्यापूर्वी फक्त दोन-तीन सेकंद तोंडामध्ये धरून ठेवा आणि नंतर हळुवारपणे ते गिळा.
२. आपण खूप गरम किंवा खूप थंड पाणी पिणे
सामन्य तापमानाचे पाणी प्या. जर खूप गरम किंवा खूप थंड पाणी प्यायले, तर तुमच्या शरीराला प्रथम त्या पाण्याला खोलीच्या तापमानावर आणण्यासाठी आणि नंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते.
३. आपण आपल्या सर्व जेवणाबरोबर पाणी पिणे
जेवणादरम्यान पाणी प्यायल्यास अन्नाचे विघटन करणे खूप कठीण होते. त्यामुळे पाणी तुम्ही जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तास नंतर प्या.
४. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पिणे
उष्णतेमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या मायक्रोप्लास्टिक्स सोडतात,जे पाण्यात उतरतात. त्यामुळे त्यातून पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पाणी पिण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?
वेदास क्युअर येथील आयुर्वेद तज्ज्ञ विकास चावला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना वरील सूचना सविस्तरपणे स्पष्ट केल्या आणि त्यात आणखी काही गोष्टी जोडल्या :
“कोमट पाणी हे आवश्यक आहे, तर बर्फाचे थंड पाणी पिणे टाळावे. आयुर्वेदानुसार बर्फाचे थंड पाणी पचनक्रियेतील अग्नी विझवते आणि पचनसंस्थेतील असंख्य समस्या निर्माण करते. कोमट पाणी त्वचा स्वच्छ करते आणि मुरमे काढून टाकते. हे त्वचा स्वच्छ करणारे आहे, जे मुरमांच्या समस्या असलेल्या महिला आणि पुरुष दोघांनीही प्यावे.
नेहमी पाठ सरळ ठेवून पाणी प्यावे. तिरके बसून किंवा आडवे झोपून पाणी पिऊ नये. “ज्यांना जेवणादरम्यान पाणी पिण्याची सवय आहे, त्यांनी ते पूर्णपणे टाळावे. त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि पोटात, छातीत जळजळ व आम्ल तयार होते,” असे ते म्हणाले.
नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड हॉस्पिटलमधील जनरल मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर डॉ. एस. ए. रहमान यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली की, प्लास्टिकच्या बाटल्या उष्णतेत किंवा थेट उन्हात ठेवल्यास त्या बाटल्यांमधून बिस्फेनॉल-ए (BPA) आणि फ्थॅलेट्ससारखी रसायनं पाण्यात मिसळतात. ही रसायनं शरीरातील हार्मोन्सचं नैसर्गिक संतुलन बिघडवू शकतात. त्यामुळे वाढ, प्रजनन क्षमता आणि आरोग्याच्या अनेक प्रक्रियांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याशिवाय अशा पाण्यात सूक्ष्म प्लास्टिकचे कणही मिसळू शकतात, ज्या पेशींमध्ये सूज येते आणि हळूहळू शरीराला हानी पोहोचवतात. म्हणून शक्यतो प्लास्टिकऐवजी स्टील किंवा काचांच्या बाटल्या वापरणं अधिक सुरक्षित ठरतं.
पाणी पिण्याबाबत गैरसमज (Debunking hydration myths)
पाणी पिण्याबाबत अनेक चुकीच्या समजुती आहेत. त्यापैकी एक म्हणजे दररोज प्रत्येकानं आठ ग्लास पाणी प्यायलंच पाहिजे. हे खरं नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि पाण्याची गरजही व्यक्तीनुसार बदलते. शरीराला जेव्हा पाणी हवं असतं तेव्हा ते आपल्याला तहानेच्या रूपात नैसर्गिक संकेत देतं.
जर शरीराला पाणी कमी मिळालं, तर मूत्रपिंडं नीट काम करू शकत नाहीत आणि मूत्राचा रंग पिवळा किंवा गडद पिवळा दिसू लागतो हा शरीरातील पाणी पातळी कमी झाल्याचा इशारा असतो. अशा वेळी शरीर स्वतः सांगतं की, आता पाणी अधिक हवं आहे.
आपल्या वैयक्तिक गरजा समजून घेतल्या आणि आहारात विविध हायड्रेटिंग पदार्थ (फळं, भाज्या, सूप, पाणी) समाविष्ट केले, तर शरीर चांगल्या प्रकारे कार्यरत राहतं. म्हणून पुढच्या वेळी पाणी प्यायच्या वेळी लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त तहान भागवायची नाही, तर संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळवायचीय