अनेकांना रात्री जेवण करूनही अचानक मध्यरात्री भूक लागते. त्यानंतर ते अनेक पदार्थ खात सुटतात. तुम्हालाही जर अशी सवय असल्यास ती वेळीच बदला. या सवयीमुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. यासोबतच मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवण्याची शक्यता असते. तर आज आपण जाणून घेऊया अचानक लागणाऱ्या भुक शांत कशी करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेवताची वेळ निश्चित करा

रात्री भूक लागण्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणाची वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. दुपारी १२ ते १ दरम्यान आणि रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत जेवण झाले पाहिजे असा प्रयत्न करा. असे केल्याने तुमचे पोट रात्री भरेल आणि तुम्हाला रात्रीच्या वेळी काही खाण्याची गरज भासणार नाही. जेवणाची वेळ निश्चित करून ही समस्या सहज सोडवली जाऊ शकते.

( हे ही वाचा: Cholesterol Control Diet: कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी व्हिनेगर कांदा ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे)

रात्रीच्या जेवणात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा

रात्रीच्या जेवणात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. असे अन्न पचायला वेळ लागतो आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणात रोटी, भाज्या, डाळ, भात, अंडी, मासे, चिकन इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता. या उपायाने तुम्हाला रात्रीची भूक लागणे थांबेल आणि तुम्ही आरामात झोपू शकाल.

मध्यरात्री भूक लागल्यास पाणी प्या.

अनेकवेळा नोकरी संदर्भात किंवा काही कामाच्या निमित्ताने आपल्याला रात्री जागे राहावे लागते. अशा स्थितीत रात्री अनेक वेळा भूक लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्रीच्या दरम्यान पाणी पिऊ शकता. पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि तुमचे शरीर हायड्रेटही राहते. पाण्यात कॅलरीज नसतात. त्यामुळे शरीराचे वजन वाढण्याचा धोका देखील नसतो.

( हे ही वाचा: वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची ‘ही’ ५ गंभीर लक्षणे वेळीच समजून घ्या; नाहीतर कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!)

हलका नाश्ताही घेता येतो

सर्व उपाय करूनही, जर तुम्हाला लेट नाईट इटिंग हॅबिटची समस्या असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही हलका नाश्ता करू शकता. तुम्ही बिस्किटे, चिप्स, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. या गोष्टी खाल्ल्याने तुमची भूकही मरते आणि याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने वजनही वाढत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to control late night eating habit gps