भारतात घरोघरी दररोज आवर्जून बनविला जाणारा पदार्थ म्हणजे पोळी. भारतात ठिकठिकाणी पोळीला वेगवेगळी नावं आहेत. पोळीला चपाती किंवा रोटी, असंही म्हटलं जातं. कोणत्याही भाजीसह किंवा अनेकदा डाळीबरोबरही लोक पोळी अगदी आवडीनं खातात. मात्र, आदल्या रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या पोळ्या अनेकदा खाव्या लागतात. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी तुम्ही हे करीत असाल; पण तज्ज्ञांच्या मते- शिळ्या पोळ्या ताज्या पोळ्यांपेक्षाही चांगल्या असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याशिवाय उरलेल्या पोळ्यांपासून आरोग्याला फायदेशीर अशा अनेक रेसिपी केल्या जाऊ शकतात. तसंच काही तज्ज्ञ यावर भर देतात की, उरलेल्या पोळ्या अनेक जीवनसत्त्वं आणि एन्झाइम्सचा स्रोत असू शकतात; ज्यांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

हेही वाचा… नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

शिळ्या पोळ्या खाण्याचे फायदे

पचन : कूलिंग प्रोसेसमुळे (शीतकरण प्रक्रियेमुळे) शिळ्या पोळ्या पचायला अधिक चांगल्या होतात आणि त्यामुळे चांगल्या जीवाणूंची संख्यादेखील वाढते. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी शिळ्या पोळ्या उपयुक्त आहेत.

पोषक घटकांचे शोषण : पोळी शिळी झाल्यानंतरही त्यात ब जीवनसत्त्व, लोह व फायबर यांसारखे बरेच पोषक घटक असतात. जसजशी पोळी शिळी होत जाते, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स (संयुक्त कर्बोदके) विभागले जातात, ज्यामुळे पोषक घटकांचे अधिक चांगले शोषण होण्यास मदत होते.

वजन व्यवस्थापन : ताज्या पोळ्यांपेक्षा शिळ्या पोळ्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. परिणामी, शिळ्या पोळ्या व्यक्तींना त्यांचे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. कमी झालेल्या आर्द्रतेमुळे शरीरात जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवण्यासही मदत होते.

रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ : पोळी शिळी होण्याची प्रक्रिया प्रो-बायोटिक्सची निर्मिती वाढवते. रोगप्रतिकार शक्ती सुधारणेसह शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करण्यात आतड्यातील मायक्रोबायोम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

रक्तातील साखरेचे व्यवस्थापन : ताज्या पोळ्यांपेक्षा शिळ्या पोळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असतो. परिणामी, रक्तशर्करा पातळीवर नियंत्रण आणि ऊर्जा प्रवाह स्थिर राहण्यास मदत मिळते.

अन्नाची नासाडी : शिळ्या अन्नपदार्थांचा पुनर्वापर हा अन्नाचा अपव्यय कमी करून, शाश्वततेला चालना देण्याचा नेहमीच एक उत्तम मार्ग आहे.

हेही वाचा… नवरात्रीत उपवास करताय? कसा असावा नऊ दिवसांचा आहार? डॉक्टरांकडून जाणून घ्या

शिळ्या पोळ्या खाल्ल्याने यकृतावर काय परिणाम?

शिळ्या पोळीच्या सेवनाने होणारे काही नकारात्मक परिणाम

पोळीची साठवण व्यवस्था व्यवस्थितरीत्या न केल्यास शिळ्या पोळीमधील प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांमध्ये थोडी घट होऊ शकते.

जर पोळी जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली, तर त्याला बुरशी लागू शकते. पोळीचे कायम वाजवी वेळेतच सेवन केले पाहिजे आणि तिची योग्य रीतीने साठवणूक केली गेली पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leftover rotis health benefits leftover chapati is healthier than fresh ones dvr