Bad Cholesterol: कोलेस्टेरॉल ही शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. कोलेस्टेरॉलच्या अती वाढीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता वाढते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे, रक्तवाहिन्यांना सुरळित रक्तप्रवाह करण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. येथे अशीच काही लक्षणे आहेत जी उच्च कोलेस्टेरॉलमुळे शरीरावर दिसू लागतात आणि ती दिसू लागल्यास वेळीस त्यापासून सुटका करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामान्यतः योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे( High Cholesterol Symptoms)

छातीत दुखणे

हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या नसांमध्ये जर कोलेस्टेरॉल जमा झाले असेल तर छातीत दुखण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे, कधीकधी छातीवर हात ठेवल्यावर वेदना जाणवू शकतात किंवा वेळोवेळी तीव्र वेदना देखील होतात.

( हे ही वाचा: शुगर २००-४०० mg/dl असल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; जाणून घ्या या पातळीवर Sugar कशी नियंत्रित करावी)

पाय दुखणे

उच्च कोलेस्टेरॉलमुळे पायांच्या रक्तवाहिन्यांपर्यंत रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पायांपर्यंत रक्त नीट पोहोचत नाही, त्यामुळे चालताना त्रास होतो, पाय दुखतात आणि पायाच्या त्वचेचा रंग बदललेला दिसू शकतो. याशिवाय पाय खूप थंड होऊ शकतात.

हृदय वेदना

छातीच्या कोणत्याही भागात दुखण्यासोबतच हृदयात दुखणे हेही कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षण आहे. कोलेस्टेरॉलच्या जास्त प्रमाणामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक देखील होऊ शकतो.

( हे ही वाचा: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत का होतात? जाणून घ्या याची गंभीर कारणे आणि बचावासाठी उपाय)

कोणाकोणाला असू शकते हृदयविकाराची समस्या

  • उच्च कोलेस्टेरॉलची समस्या बहुतेकदा अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असते आणि जंक फूडचे प्रमाण जास्त असते.
  • वाईट कोलेस्टेरॉल जमा होण्याचे कारण पॅकबंद वस्तूंचे जास्त सेवन करणे देखील असू शकते.
  • कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा अशा लोकांना देखील कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो.
  • जे लोक धूम्रपान करतात आणि मद्यपान करतात त्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pain in different body parts due to bad cholesterol know how to identify its signs gps