फुफ्फुसात पाणी भरणे किंवा काही द्रव जमा होणे हा पल्मोनरी एडिमा नावाचा आजार आहे. या आजारामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. हा आजार तेव्हा होतो ज्यावेळी हृदयाच्या स्नायूंना रक्त पंप करण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. अशा स्थितीत फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब पडतो आणि फुफ्फुसे पुरेशी हवा घेऊ शकत नाहीत. या स्थितीत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. बीपी, हृदयविकाराचा झटका आणि न्यूमोनियासारख्या काही आजारांमुळे ही समस्या झपाट्याने परिणाम करते. या आजाराची मुख्य लक्षणे कोणती आहेत, यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फुफ्फुसात पाणी का भरते?

फुफ्फुसात पाणी भरण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. हृदयविकारामुळे फुफ्फुसात पाणी भरू शकते. न्यूमोनियामध्ये शरीराचा कोणताही भाग खराब झाला तरी फुफ्फुसात पाणी भरण्याची समस्या उद्भवू शकते. ब्लड इंफेक्शन, सूज यासारख्या अनेक आरोग्य समस्यांमुळे फुफ्फुसात पाणी भरण्याची समस्या उद्भवू शकते. पल्मोनरी मेडिसिन, नवी दिल्लीचे डॉ अशोक राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, या आजाराची लक्षणे त्वरित ओळखली गेली, तर या आजारावर सहज उपचार करता येऊ शकतात.

( हे ही वाचा: हिवाळ्यात ‘या’ ३ आजारांचा होतो सर्वाधिक त्रास; आतापासूनच सावध व्हा, नाहीतर उद्भवेल गंभीर समस्या)

फुफ्फुसात पाणी भरण्याची लक्षणे कोणती आहेत?

फुफ्फुसात पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. अशी लोक झोपली की, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. या रुग्णांना फेसयुक्त थुंकी आणि हृदयाचे ठोके अनियमित असतात. अशा स्थितीत रुग्ण तणावाखाली असतो आणि त्याला चिंताग्रस्त आणि अस्वस्थ वाटते आणि पाय सुजतात.

फुफ्फुसात पाणी भरणे गंभीर आहे का?

  • फुफ्फुसाभोवती पाणी भरणे ही गंभीर स्थिती असू शकते. जर रोगाची लक्षणे ओळखली गेली नाहीत तर स्थिती गंभीर होऊ शकते.
  • फुफ्फुसांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचे अनुकरण करा
  • फुफ्फुस निरोगी ठेवायचे असतील तर आल्याचा चहा घ्या. आल्यामध्ये असलेले एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि फुफ्फुस निरोगी ठेवतात.
  • फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी दालचिनीचे सेवन करा. तुम्ही दालचिनी पाण्यात उकळून वापरू शकता.
  • हळदीचे सेवन केल्याने फुफ्फुसही निरोगी ठेवता येतात. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन फुफ्फुसातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि फुफ्फुस निरोगी ठेवते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is pulmonary edema know the reason cause and home remedies gps