Premium

Raksha Bandhan 2022: भद्रा काळात का बांधू नये भावाला राखी? जाणून घ्या यामागचं कारण आणि रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त

भद्रा काळ म्हणजे काय आणि या काळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते, हे बहुतेकांना माहित नाही. म्हणूनच आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Raksha Bandhan 2022
शास्त्रानुसार भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अशुभ मानले जाते. (संग्रहित फोटो)

भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व सांगणारा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन! आज, म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरे केले जाईल. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. मात्र, यावर्षी ही पौर्णिमा दोन दिवसांची असल्याने रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही तज्ज्ञ ११ ऑगस्टला तर काही १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करावा असे सांगत आहेत. शास्त्रानुसार भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अशुभ मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, भद्रा काळ म्हणजे काय आणि या काळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते, हे बहुतेकांना माहित नाही. म्हणूनच आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Raksha Bandhan 2022: राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व काय? यंदाच्या रक्षाबंधनाला ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की नात्याने शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राची भावना शनिदेवासारखीच आहे. म्हणजेच भद्रा ही सूर्याची कन्या आहे. भद्राची स्थिती पंचांगाने मोजली जाते. याचा अर्थ समजून घेण्यासाठी ब्रह्माजींनी पंचांगात वेगळे स्थान दिले आहे, असेही म्हटले जाते. भद्रा काळात भावांनी राखी बांधू नये अशी लोकांची श्रद्धा आहे.

रावणाच्या साम्राज्याचा अंत होण्याचे कारणही हाच भद्रा काळ होता असे म्हणतात. रावणाची बहीण शूर्पणखा हिने रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळात रावणाला राखी बांधली. त्यानंतर लंकेची वाईट अवस्था सुरू झाली, असे म्हणतात. ज्योतिषी मानतात की भद्रा तिन्ही लोकांमध्ये फिरते परंतु ती वेगवेगळ्या राशींमध्ये राहते. पण जेव्हा ती मृत्युलोकात राहते, तेव्हा सर्व शुभ कार्ये थांबवावीत. कारण अशा स्थितीत शुभ कार्यात अडथळा निर्माण होतो.

Raksha Bandhan 2022 : भावाच्या हातावर चुकूनही बांधू नका ‘ही’ राखी; ज्योतिषशास्त्रानुसार मानली जाते अशुभ

आज ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. भद्राकाळाबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. यावेळी भद्राची सावली अधोलोकात पडेल असे ज्योतिषी सांगतात. त्यामुळे त्याचा पृथ्वीवर काहीही परिणाम होणार नाही.

या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी सुरू झाली आहे. संध्याकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी भद्रा काळ सुरु होत असून ते रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी संपेल. ११ ऑगस्ट रोजी, प्रदोष काळात, संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते ६ वाजून १८ मिनिटांच्या दरम्यान राखी बांधता येईल. भद्राच्या शेवटी, रात्री ८ वाजून ५४ मिनिटे ते ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राखी बांधता येते. परंतु हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर राखी बांधण्यास मनाई आहे. याच कारणामुळे १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे खूप शुभ ठरेल, असे बहुतांश तज्ज्ञांचे मत आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why tying rakhi during bhadra is considered inauspicious know the reason behind this and the right time of raksha bandhan 2022 pvp

First published on: 09-08-2022 at 11:31 IST
Next Story
आरोग्यवार्ता : स्त्रियांतील स्थूलत्वाचा ‘एलटीएल’शी संबंध