रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आरोग्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी रक्षाबंधनाचा सण गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ च्या संध्याकाळपासून सुरू होईल आणि शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ च्या सकाळपर्यंत चालेल. धार्मिक मान्यतांनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आज आपण रक्षाबंधनाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा रक्षाबंधनाच्या धाग्यावर तीन गाठी बांधतात. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते कारण या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीशी संबंधित आहेत. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी, तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते, असे म्हणतात. अशा स्थितीत राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ असते.

Raksha Bandhan Gift Ideas for Sister : यंदाच्या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणीला ‘या’ भेटवस्तू देऊन करा सरप्राइज

गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे. परंतु ती भद्रा पूर्ण आहे. ज्योतिषशास्त्रातील ‘शुभकरम् पुच्छम व वसरे शुभकारी रात्रौ’ या तत्त्वानुसार गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनंतर शुभ योग तयार होईल. भद्राच्या शेवटी, रात्री ८ वाजून ५४ मिनिटे ते ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल. परंतु हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर राखी बांधण्यास मनाई आहे. १२ ऑगस्ट रोजी भद्रा नाही, परंतु पौर्णिमा सकाळी ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत आहे. याच कारणामुळे १२ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जाईल.

धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला आणि बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावे. सर्वप्रथम बहिणी आपल्या भावाला कुंकू आणि तांदूळ यांचा टीका लावावा. तुपाच्या दिव्याने भावाला ओवाळावे. त्यानंतर त्याला मिठाई भरवून भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)