दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी गुरुवारी, ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणातील ही पौर्णिमा ११ ऑगस्टपासून सुरू होऊन १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत असेल. ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस भद्रा काळ असल्याने १२ ऑगस्टलाही रक्षाबंधन साजरे करता येणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन शुभ मुहूर्तावर करणे लाभदायक असते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेतही रंगीबेरंगी राख्या पाहायला मिळत आहेत. पण भावाला राखी बांधताना बहिणींनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. आज आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या वेळी भावांच्या हातावर कोणत्या प्रकारची राखी बांधू नये.

Raksha Bandhan 2022: राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व काय?

  • लोकांना देवाचे चित्र असलेली राखी खरेदी करणे आवडते. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे देवाचे आशीर्वाद देखील मिळतात. वास्तविक, भावांच्या मनगटावर राख्या दीर्घकाळ असतात. अशा स्थितीत त्यांचे हातही घाण होतात किंवा अनेकदा राख्या तुटतात. या दोन्ही परिस्थितीत देवाचा अपमान होतो.
  • देवांचे फोटो असणाऱ्या राख्यांचा वापर जबाबदारीने करावा. रक्षाबंधननंतर अनेकदा या राख्यांवरील फोटो इथे इथे पडलेले आढळून येतात. या माध्यमातून कळत न कळत आपण देवीदेवतांचा अपमान करुन एखाद्याच्या भावना दुखावण्यास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे देवांच्या फोटो असणाऱ्या राख्या वापरणार असाल त्यांची योग्यपद्धतीने काळजी घेण्याची जबाबदारीही स्वीकारावी.
  • या पवित्र सणात चुकूनही भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी बांधू नका. यासोबतच ज्या राखीमध्ये काळा धागा वापरण्यात आला आहे, ती भावाच्या मनगटावर बांधू नये. वास्तविक काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शुभ कार्यात या रंगाचा वापर निषिद्ध मानला गेला आहे.
  • विविध डिझाईनच्या राख्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. अशा वेळी बहिणींनी भावासाठी राखी खरेदी करताना थोडी काळजी घ्यायला हवी. राखीवर कोणत्याही प्रकारचे अशुभ चिन्ह असू नये. सहसा, अशा प्रकारची राखी लहान मुलांसाठी पाहिली जाते, जी त्यांना आकर्षित करते. परंतु अशा राख्या शुभ नसतात.
  • अनेक वेळा राखी बराच काळ ठेवली असेल तरी तुटते किंवा खराब होते. अशा वेळी चुकूनही अशा प्रकारची राखी बांधू नका. अशा राख्या हिंदू धर्मात अशुभ मानल्या जातात. पूजेतही तुटलेल्या वस्तूंचा वापर करू नये.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)