या नकाशाच्या उजवीकडील खालच्या कोप-यात नजर टाकल्यास लक्षात येईल की ज्या राज्यांमधून लोकसभेवर जास्त खासदार पाठविले जातात, त्याच राज्यांतील खासदारांवर जास्त गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांची नोंद आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांमध्ये शिवसेना अग्रस्थानी
शिवसेना पक्षाने सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांमध्ये पहिला क्रमांक पटकावल्याचे दिसून येते. लोकसभेत १० सदस्यांचे संख्याबळ असणा-या शिवसेनेतील ८० टक्के खासदारांवर गुन्ह्याचे आरोप आहेत. तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणा-या भाजपच्या ११२ पैकी ४१.०७ टक्के खासदारांवर गुन्हेगारी आरोप दाखल आहेत. याबाबतीत तिस-या क्रमांकावर असणा-या संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) १९ खासदारांपैकी ३६.४८ टक्के खासदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत.