प्रियंका गांधी-वढेरा सध्या केवळ अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात प्रचार करत असल्या तरी भविष्यामध्ये त्या काँग्रेस पक्षात आणखी जबाबदारी घेऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. रायबरेलीत गेल्या आठवडय़ात प्रियंका यांनी उलेमांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यानंतर उलेमांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियंका सक्षम आहेत. प्रचारात त्यांच्याकडे धुरा दिली असती तर काँग्रेसला आणखी फायदा झाला असता, असे जमाते ए उलेमा हिंदचे सरचिटणीस मेहमूद मदानी यांनी सांगितले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात  ते बोलत होते. सुन्नी मुस्लिमांची प्रभावी संघटना मानल्या जाणाऱ्या उलेमांच्या प्रतिनिधींशी प्रियंका यांनी दोन तास चर्चा केली.आमचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले असे संघटनेचे सरचिटणीस बाबर अश्रफ यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulema priyanka gandhi