राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यांना वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन देण्यात आला आहे. यानंतर ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाणार की अजित पवार गटात जाणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना नवाब मलिकांशी चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१५ ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “माझी आणि नवाब मलिकांची भेट झालेली नाही. मी कालच कोल्हापूरला आलो आहे. फोनवर अशी चर्चा होऊ शकत नाही. अटक झालेल्या व्यक्तिशी अशाप्रकारे फोनवर बोलता येत नाही. त्यांना सध्या वैद्यकीय कारणाने तुरुंगातून बाहेर सोडलं आहे. त्यातून ते बाहेर आल्यावर त्यांना भेटता येईल.”

यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबतही विचारणा केली. राज ठाकरे म्हणाले होते की, भाजपाने मला ऑफर दिली आहे. मात्र, भाजपा अजित पवारांचं काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन.

“मी कशाला त्यात नाक खुपसू”

राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “हे राज ठाकरे बोलले आहेत, मी सांगितलेलं नाही. राज ठाकरेंना भाजपाने ऑफर दिली असेल, पण मला त्याचं काहीही करायचं नाही. भाजपाने ज्याला ऑफर दिली तो त्याचा आणि भाजपाचा विषय आहे. मी कशाला त्यात नाक खुपसू.”

हेही वाचा : शरद पवारांची भेट चोरडियांच्याच घरी का घेतली? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण!…

“असलं काही तरी विचारू नका”

“असलं काही तरी विचारू नका. माझ्याशी संबंधित प्रश्न किंवा राज्य सरकारशी संबंधित असणारे प्रश्न जरूर विचारा,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on discussion with nawab malik after bail pbs