वाई: वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे प्रमुख नेते मकरंद पाटील यांनी आज बुधवारी सायंकाळी उशिरा बारामती येथे गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी  या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास विविध विषयांवर  चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पाया पडत घेतला आशीर्वाद, भाऊबीजेचा VIDEO शेअर करत म्हणाल्या…

याभेटीत त्यांच्यातील चर्चेने मात्र साताऱ्याच्या राजकिय वर्तूळात एकच खळबळ उडाली. नुकत्याच किसन वीर साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभाच्या भाषणात आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले होते,की आम्ही शरद पवारांनशी निष्ठा ठेऊन आहोतच.मी घेतलेली भूमिका माझ्या मतदार संघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदार संघाच्या विकास कामांसाठी निर्णय घेतला.त्याचवेळी आमदार पाटील यांनी राजकीय तडजोडी आणि शरद पवार यांच्याशी असणाऱ्या निष्ठेबाबत भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली होती.तरीही शरद पवार निष्ठावंत वेगवेगळी चर्चा आ पाटील यांच्या मतदार संघात करत होते.त्यामुळे या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> शरद पवार-अजित पवारांच्या गाठीभेटी, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण? मंत्री संजय बनसोडे म्हणाले…

याभेटीत शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरु झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. दरवर्षी दिवाळी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात.आमदार मकरंद पाटील दरवर्षी तिथे हजेरी लावत असतात.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही  बहुतांशी आमदारांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीत किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप  काही अडचणी याची व मराठा आरक्षणावर ही साताऱ्यातील नेमक्या स्थितीची माहिती श्री. पवार यांनी घेतली. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास विविध विषयांवर  चर्चा झाली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar faction mla makarand patil meets ncp chief sharad pawar zws