चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा असल्याचे विधान केले होते. उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात हे विधान केल्यामुळे बारामतीत नाराजी पसरली होती. या विधानाचा मतदानावर काही परिणाम झाला का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला काहीही अर्थ नव्हता. वास्तविक सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असताना शरद पवारांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण नंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांना पुण्यातच राहण्याचा सल्ला आम्ही दिला. बारामतीचा प्रचार आमचे कार्यकर्ते बघून घेतील, असेही त्यांना सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी ते विधान बोलायलाच नको होते. पण ते का बोलून गेले? हे मला माहीत नाही. चंद्रकांत पाटील जे बोलले, ते चूकच होते. त्यांनी हे बोलायला नको होते.

“…तर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील”, शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच यावर निर्णय होऊ शकतो, असे सांगितले होते. उद्धव ठाकरेंचाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे बोलले गेले. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना ते म्हणाले, “शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी विधानं करतात. मी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष जवळून पाहिलं आहे. ते आपला पक्ष विलीन करतील असं मला अजिबात वाटत नाही.”

काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन करायचे असतील तर आधी राष्ट्रवादी काँग्रेसला हा निर्णय घ्यावा लागेल, ही चर्चा आता राजकीय वर्तुळात होत असताना अजित पवार त्यावर म्हणाले की, शरद पवार यांना जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते इतरांना त्या निर्णयात ओढून घेतात. आपण सर्वसमंतीने सामूहिक निर्णय घेत आहोत, असे चित्र ते निर्माण करतात. पण शरद पवारांना पाहिजे तेच करतात. फक्त सर्वांना घेऊन चर्चा केल्याचे ते दाखवितात, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवारांवर केली.

रोहिताचा बॅलन्स बिघडलाय

बारामती लोकसभेत तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान पार पडले. त्यानंतर बारामती लोकसभेत अडकून पडलेले पवार कुटुंबिय आता महाराष्ट्राच्या उर्वरीत मतदारसंघात प्रचारासाठी उतरले आहेत. शिरूर लोकसभेत बोलत असताना रोहित पवार म्हणाले होते की, शिरूर लोकसभेतही अजित पवार घरातलाच उमेदवार देणार होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले, रोहितचा अलीकडे थोडा बॅलन्स बिघडला आहे. तो हल्ली काहीही बडबड करायला लागला आहे, अशी टीका केली.