Amit Thackeray on Sada Sarvankar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन टिपेला पोहोचलेली असातना सोमवारी दादार माहीम मतदारसंघात वादाची ठिणगी पडली. माहीम कोळीवाड्यामधअये घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणारे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर यांना महिलांनी धारेवर धरलं. या प्रकरमावर आता अमित ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहिम कोळीवाड्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स का हटवले? ते कधी सुरू करणार? असा थेट जाब विचारत एका कोळी महिलेने सरवणकरांवर विविध प्रश्नांचा भडिमार केला. तुमच्या हातापाया पडून झाले, आता आमच्या पोटावर आले आहे. लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा” असा संताप या व्यक्त करत महिलेने सरवणकरांना घरात येण्यासही मनाई केली. यावेळी सरवणकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तिथून पुढे चला असे म्हणत होते, पण महिला वारंवार “माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय पुढे जाऊ नका”, असे म्हणत सरवणकर यांना तिने धारेवर धरत होती. परंतु, महिलेचा संताप पाहून सदा सरवणकर काहीही न बोलता तिथून निघून गेले. माहीम कोळीवाड्यातील महिलेचा सदा सरवणकरांविरोधात असलेला रोष पाहता आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला.

या घटनेवर सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माहिममध्ये दारूचा धंदा सुरू केला होता. तक्रार केल्यानंतर तिचा दारूचा धंदा बंद झाला. हाच राग तिने प्रचारादरम्यान काढला. ही महिला हप्ता घेण्याचं काम करत असून त्या उबाठाच्या पदाधिकारीही आहेत. कितीही काहीही केलं तरीही दारूची भट्टी आम्ही तिथे सुरू करायला देणार नाही. असं समाधआन सरवणकर म्हणाले.

हेही वाचा >> VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”

दारूचा स्टॉल नव्हे…

m

यावर अमित ठाकरे म्हणाले की, “महिला बचत गटाने सुरू केलेला स्टॉल आहे. मी तिथे गेलो होतो. साहेबांनाही तिथे जायचं होतं. यामुळे महिलांच्या हाताला रोजगार आहे. तसंच, उत्तम प्रकारचं जेवण बनवलं जातं. पण निवडणुकीच्या आधीच त्यांनी तो स्टॉल बंद करून टाकला. दारू विकतात असं कारण सांगून स्टॉल बंद केला. पण असं काही नाहीय. तो कुठेतरी हिसकावून घेतला आहे, त्यामुळे हे बरोबर नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit thackeray on sada sarvankar over mahim conflict of women stalls remove sgk