उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. अकोला जिल्ह्यात आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेव्हा अमोल मिटकरी यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या समोरच या निवडीचा निषेध केला. यामुळे एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला जिल्ह्यात अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. गेल्यावर्षी मिटकरी आणि मोहोड यांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी, ४ ऑक्टोबर शिवा मोहोड यांची अजित पवार गटाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी घोषणा वळसे-पाटील यांनी केला. यावर मिटकरींनी आक्षेप घेत राडा केला.

हेही वाचा : अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अमोल मिटकरी म्हणाले, “जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही, तोपर्यंत ही निवड केली जाणार नाही. मोहोडचा मी निषेध करतो. अजित पवार यांच्याकडे मोहोडची तक्रार केली आहे. अजित पवारांनी मोहोडला पक्षप्रवेश दिला नाही. माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे.”

हेही वाचा : राष्ट्रपती राजवटीवरून देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपाकडं बहुमत होतं, तर…”

यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ( अजित पवार गट ) सूरज चव्हाण यांनी हस्तक्षेप केला. “सगळ्या निवडी सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या मान्यतेने होतील. निवडी मुंबईत होतील. अकोल्यात निवडी होणार नाही. अशा पद्धतीनं चित्र करायचं असेल, तर बाहेरच्यांना इथं बोलावता कशाला? तुम्हीच इथे भांडण करत बसा. संघटनेची शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे,” अशी नाराजी सूरज चव्हाण यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari clash between shiva mohod akola elect ncp ajit pawar group dilip walase patil ssa