scorecardresearch

Premium

अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

“….हे फक्त शरद पवार यांना नाहीतर सर्व बंधूंना लागू होतं”, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar 3
अजित पवार गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही? यावर भाष्य केलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोगसमोर आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे.

अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यावर कुटुंबात काय चर्चा झाली? यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या निर्णयानंतर सर्व बंधूंनी फोन करू शरद पवार यांना लढायचं आहे, असं सांगितल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलत होत्या.

हेही वाचा : पक्षात खरंच फूट पडलीय? भाजपाबरोबर जाण्याचा विचार? शरद पवारांची थेट भूमिका, म्हणाले…

गेले ५६ वर्षे शरद पवार एकही निवडणूक हरले नाहीत. यामागचं रहस्य काय? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, “त्यांचे गुणसूत्र आणि त्यांच्या आईची इच्छाशक्ती यापाठिमागे आहे. त्यांची आई खूप शक्तीशाली महिला होती. हे फक्त शरद पवार यांना नाहीतर सर्व बंधूंना लागू होतं. मला माहिती नाही, त्यांच्या आईने सर्वांना काय खाऊ घातलं?”

हेही वाचा : “…म्हणून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचा टोला

सगळे बंधू एकत्र आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर सर्व बंधूंनी शरद पवारांना फोन करून, तुला लढायचं आहे, असं सांगितलं. ८३,८४ आणि ८५ वर्षाचे बंधू एकमेकांना फोन करून लढण्याबाबत बोलतात. ७६ आणि ७५ वर्षांचे बंधू प्रताप पवारही म्हणाले, तुम्हाला लढायचं आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule on sharad pawar and brother after call ajit pawar join shinde fadnavis govt ssa

First published on: 05-10-2023 at 08:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×