शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपाबद्दल केलेल्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. “आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे,” असं वक्तव्य गजानन कीर्तिकरांनी केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी ( २६ मे ) अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा गजानन कीर्तिकरांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “गजानन कीर्तिकरांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या आहेत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : “मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर शिंदे-फडणवीस सरकार पडेल”, नाना पटोलेंच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष…”

गजानन कीर्तिकरांनी लोकसभेच्या २२ जागांवर दावा केला आहे, याबाबत प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, “आमच्यात कोणतीही समस्या नाही. शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात सर्व गोष्टी ठरतील तेव्हा तुम्हाला सांगू,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत पण संजय राऊत असा चमत्कार…” संजय शिरसाट यांची जहरी टीका

गजानन कीर्तिकर काय म्हणाले होते?

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजानन कीर्तिकरांनी खंत व्यक्त केली होती. “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, एनडीएचा घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे,” असं कीर्तिकरांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reply gajanan kirtikar comment over bjp behavioral behavior shinde group 13 mp ssa