अजित पवारांनी तासगाव कवठेमहाकांळ या ठिकाणी बोलत असताना आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय धुरळा उडाला. यानंतर सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीय फाईल दाखवली कशी काय? असा सवाल केला आहे. या सगळ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार म्हणाले, “केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली.”

देवेंद्र फडणवीसांनी मला फाईल दाखवली-अजित पवार

“राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं सरकार निवडून आलं. फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखवली. ते म्हणाले, तुमच्या आबांनी तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं” असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी यावर भाष्य केलं.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मंत्री झाल्यानंतर तुम्ही शपथ घेता ती गोपनीयतेची असते. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी अजित पवारांना फाईल दाखवलीच कशी? महाराष्ट्राशी हा विश्वासघात नाही का? ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप कुणी केले होते? तर ते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केले आहेत. त्यामुळे उत्तर त्यांना द्यावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवण हे चिंताजनक आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मुंबई तकशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“या संदर्भात माझी भूमिका मी मांडली आहे. तसंच जी फाईल दाखवल्याचा उल्लेख झाला ती कुठल्याही प्रकारची गोपनीय फाईल नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी ती मागवावी. वारंवार तो प्रश्न नको. आर. आर. पाटील हयातीत नाहीत. त्यामुळे त्या विषयावर बोलणं योग्य नाही. ” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.