Lalbaugcha Raja Ganpati Visarjan Highlights: मुंबईतील प्रसिद्ध मंडळ लालबागचा राजा गणपतीचं अखेर विसर्जन पार पडलं आहे. रविवारी सकाळपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी खोळंबून असल्याचे चित्र दिसलं. यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह खास तराफा तयार करण्यात आला होता. मात्र लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावर चढू शकत नसल्यामुळे कित्येक तासांपासून लालबागचा राजा समुद्रातील चार-पाच फूट उंचीच्या पाण्यातच स्थिरावला आहे. दरम्यान कोळी बांधवांनी लालबागचा राजा मंडळावर गंभीर आरोप केले आहेत.

लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनासंबंधी आणि त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी खालील ब्लॉगमध्ये जाणून घ्या…

Live Updates

Lalbaugcha Raja Visarjan Live Updates | लालबागचा राजा विसर्जन २०२५ लाईव्ह अपडेट्स

19:18 (IST) 6 Sep 2025

Ganesh Visarjan 2025 LIVE Update: रत्नागिरीत भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचे विसर्जन

गणपती बाप्पा मोरया या जयघोषात आज अनंत चतुर्दशी दिवशी रत्नागिरीत गणरायाला निरोप देण्यात आला. मांडवी समुद्र किनाऱ्याबरोबरच जिल्ह्यातील इतर समुद्रकिनारी गणेशभक्तांनी बाप्पांच्या विसर्जनासाठी गर्दी केली होती. यावर्षी ६१ सार्वजनिक तर ३६ हजार घरगुती बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.

18:16 (IST) 6 Sep 2025

पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन

  • मानाचा पहिला कसबा गणपतीचे ३ वाजून ४५ मिनिटे
  • मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती ४ वाजून ०५ मिनिटे
  • मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती ४ वाजून ३५ मिनिटे
  • मानाचा चौथा तुळशीबाग गणपती ५ वाजून ०७ मिनिटे
  • मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती ५ वाजून ४० मिनिटे
  • 17:18 (IST) 6 Sep 2025
    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: पुण्यातील मिरवणुकीत अजित पवारांकडून ढोलवादन

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री जिलब्या मारुती मंडळ, ट्रस्टच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यानंतर मिरवणुकीत सहभागी होत ढोलपथकातील ढोल वाजवून त्यांनी भाविकांबरोबर मिरवणुकीचा आनंद घेतला.

    16:11 (IST) 6 Sep 2025
    ‘लालबागचा राजा’सह मुंबईतील मोठे गणपती मंडपाबाहेर, यंदा श्रॉफ इमारतीतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी

    गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा या १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता आज बाप्पाला निरोप देऊन होते आहे. पाहा फोटो

    15:49 (IST) 6 Sep 2025

    मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेते पदप्रतिष्ठा बाजूला ठेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मानाच्या गणपतींची मिरवणूक बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मिसळवर ताव मारला. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यात राजकीय गप्पांचा फड रंगला.

    14:14 (IST) 6 Sep 2025

    Gharguti Ganesh Visarjan 2025 LIVE Update: गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक गिरगाव चौपाटीवर दाखल

    गिरगाव चौपाटी ही मुंबईतील सर्वात मोठी चौपाटी असून या ठिकाणी दरवर्षी जास्तीतजास्त गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. पाहा लोकसत्ताचा एक्सक्लुजिव्ह व्हिडीओ

    14:11 (IST) 6 Sep 2025

    VIDEO : Ganesh Visarjan 2025: जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत अपूर्व उत्साह…

    वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. काही मार्गांवर लहान-मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
    14:07 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: पुण्यातील तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

    पुण्यातील तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरू झाली असून अनेक भाविक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. (Photo by Aul Hotizon)

    13:46 (IST) 6 Sep 2025

    पुणे : मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे बेलबाग चौकात दिमाखात आगमन

    मोबाईल आणि संगणकाच्या एका क्लिकवर माहिती पोहचत असताना विसर्जन मिरवणुकीत स्वराज्य पथकाने ‘पोस्टमन’च्या आठवणींना उजाळा दिला. पोस्टमनच्या वेशातील वादक, लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा अन् जुन्या कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह…

    13:16 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: “ही शान कुणाची…”, भाविकांच्या गर्दीचा महापूर, घोषणाबाजीत लालबागच्या राजाला निरोप

    लालबागच्या राजाची शाही मिरवणूक सुरू झाली असून लालबागच्या राजाची शेवटची झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. ‘ही शान कुणाची, लालबागच्या राजाची’, अशा घोषणा देत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

    12:22 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

    लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती पार पडल्यानंतर आता बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मूर्ती बाहेर काढण्यात आली आहे. यावेळी लालबागच्या राजाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे.

    12:05 (IST) 6 Sep 2025

    पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष

    मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सुरु झाली. मिरवणुकीत लोणकर बंधूचे नगारा वादन, रुद्रांग, तालगर्जना,आदिमाया,स्वराज्य पथके सहभागी झाले आहेत.

    मंडळाने यंदा वृंदावनात ‘तुळशीबागेचा महागणपती’ हा देखावा साकारला आहे.

    12:01 (IST) 6 Sep 2025

    मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष

    आहे. फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सुरु झाली.

    मिरवणुकीत लोणकर बंधूचे नगारा वादन, रुद्रांग, तालगर्जना,आदिमाया,स्वराज्य पथके सहभागी झाले आहेत.

    मंडळाने यंदा वृंदावनात ‘तुळशीबागेचा महागणपती’ हा देखावा साकारला आहे.

    11:47 (IST) 6 Sep 2025

    Gauri Avahan and Pujan 2025: ज्येष्ठागौरीचे गणपतीशी असलेले नाते नेमके काय आहे? तिचा इतिहास व परंपरा काय सांगते?

    Ganesh Chaturthi Jyeshtha Gauri traditions: सृष्टी जणू सासरच्या तप्त झळा सोसून माहेरी आलेल्या विवाहितेप्रमाणे पुन्हा एकदा बहरू लागते. गावोगावीच्या माता-भगिनी सृष्टीचे हे नवतेजाने बहरास येणे ज्येष्ठागौरी व्रताच्या माध्यमातून साजरे करतात. …अधिक वाचा
    11:29 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: पुण्यातील मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

    पुण्यातील श्री कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मिरवणुकीत हा गणपती सर्वात पुढे असेल.

    11:05 (IST) 6 Sep 2025

    विसर्जनासाठी पालघर प्रशासन सज्ज ठिकठिकाणी बंदोबस्त आणि स्वच्छतेवर भर

    गणेशकुंड येथे मंडप उभारण्यात येणार असून नगरपरिषदेचे कर्मचारी विसर्जन प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवणार आहेत. कोणताही अपघात टाळण्यासाठी प्रत्येक विसर्जनस्थळी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. …सविस्तर बातमी
    10:46 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: मुंबईतील तेजूकाय मंडळाचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ

    मुंबईतील प्रसिद्ध तेजूकाय मंडळाचा गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात तेजूकाय मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. शाडू आणि नैसर्गिक रंगापासून तयार केलेली २८ फूटांची गणेश मूर्ती मंडळाचे कार्यकर्ते स्वतः विसर्जित करतात.

    10:45 (IST) 6 Sep 2025

    पिंपरी-चिंचवड: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे विजेच्या खांबाला धडकला; दोघांना करंट लागल्याने…

    चिंचवड येथील मोहनगरमध्ये गणपती बाप्पांची मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरू होती. डिजेवर सर्व गणेश भक्त नाचत होते. …सविस्तर बातमी
    09:55 (IST) 6 Sep 2025

    Anant Chaturdashi 2025 : गणपती विसर्जन २०२५ : ठाणे जिल्ह्यात उद्या ४४ हजार ३२९ गणेश मूर्तींचे होणार विसर्जन

    यंदा ठाणे जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी ४४ हजार ३२९ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७९४ सार्वजनिक तर, ४३ हजार ५३५ घरगुती गणपतींचा समावेश आहे. …वाचा सविस्तर
    09:28 (IST) 6 Sep 2025

    गणेश विसर्जनाच्या दिवशी घराबाहेर पडतांय… वाहतुकीतील बदल जाणून घ्या…

    नाशिक शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक तसेच नाशिकरोडसह इतर भागात निघणाऱ्या मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शनिवारी मिरवणूक मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत. …सविस्तर बातमी
    09:23 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरू, लालबागच्या राजाचे विसर्जन कधी?

    मुंबईच्या गणेश गल्लीतील मुंबईचा राजाची मिरवणूक सुरू झाली आहे. मोठ्या धुमधडाक्यात भाविक गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत. तर थोड्याच वेळात लालबागच्या राजाची मिरवणूक निघणार आहे.

    09:19 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Visarjan 2025 LIVE Update: ‘दहा दिवस कसे निघून गेले, कळलंच नाही’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पूजा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दहा दिवस इतक्या लवकर निघून गेले, कुणालाही कळले नाही. सर्वजण भक्तीत रमले होते. विसर्जनादरम्यान सर्व नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

    09:01 (IST) 6 Sep 2025

    कृत्रिम कुंड, हौदांची व्यवस्था; नदीत विसर्जन करताना सावधगिरी बाळगण्याची सूचना

    गणेश विसर्जनासाठी पावसामुळे धरणे, तलाव यांसह इतर सर्व जलाशये काठोकाठ भरल्याने महानगरपालिकेच्या वतीने अशा ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
    08:30 (IST) 6 Sep 2025

    Pune Ganesh Visarjan 2025 : गणपती विसर्जनादरम्यान तत्काळ वैद्यकीय मदत लागल्यास काय कराल…

    Pune Ganpati Visarjan 2025 Updates : विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे. …सविस्तर वाचा
    08:29 (IST) 6 Sep 2025

    गणपती विसर्जन २०२५: अनंत चतुर्दशीला कोणत्या वेळी कराल बाप्पाचे विसर्जन?

    Ganesh Visarjan 2025: यंदा ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी बाप्पाचे विर्सजन करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता हे आपण जाणून घेऊ …वाचा सविस्तर
    08:27 (IST) 6 Sep 2025

    Ganesh Festival Pune : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांना दिलासा

    ठरवलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन झाले, तर पथकांची संख्या किंवा सदस्य संख्येवर कोणताही अडसर आणला जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. …अधिक वाचा

    Mumbai Ganesh Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनास विलंब, अत्याधुनिक तराफ्यावर गणेशमूर्ती चढविताना अडचण ( छायाचित्र सौजन्य : आकाश पाटील )