नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेवार शुभांगी पाटील यांना जवळपास ४३ हजार मतं मिळाली. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली,’ अशा आशयाचा खुलासा केला. अजित पवार यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होईल, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाणा आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (३ फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सांगितले होते, पण…”

….असा अजित पवार यांच्या विधानाचा अर्थ असावा

“महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या ज्या उमेदवार होत्या त्यांचं काम राष्ट्रवादी पक्षाने केले. मी अजित पवार यांचे विधान ऐकलेले नाही. नाशिक पदवीधर मतदरासंघाच्या निवडणुकीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ही जागा काँग्रेसला दिली होती. मात्र या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरू शकले नाही. त्या जागेवर काँग्रेसच्या नेत्याच्या पुत्राने अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे या जागेसाठी काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, असा अजित पवार यांच्या विधानाचा अर्थ असावा. या जागेवर आमच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना ४३ हजार मतं मिळाली,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >> ठरलं! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी कायम, शनिवारी जागावाटप जाहीर होणार

नाना पटोलेंनी घेतली आक्रमक भूमिका

अजित पवार यांच्या विधानानंतर नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. “अजित पवारांनी चांगला खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली, अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार ही एक जबाबदार व्यक्ती आहे. ते अशा पद्धतीने बोलत असतील तर या सगळ्या गोष्टीची चिंता आमच्याही मनात आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर याबाबत आम्ही खुलासा करू,” असे नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil clarification on ajit pawar statement of ncp help satyajeet tambe to win prd
First published on: 03-02-2023 at 19:36 IST