शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असून सध्या राज्यात शिंदे गट-भाजपाचे सरकार आहे. शिवसेनेतील बंडखोरीची त्यावेळी अनेकांना चाहूल लागली होती, असे म्हटले जाते. याबाबत महाविकास आघाडीच्या अनेत नेत्यांनी भाष्यदेखील केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीवर महत्त्वाचे विधान आहे. सहा महिन्यांअगोदरच माझ्या कानावर कुजबूज आली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला. मात्र त्या विश्वासाला तडा गेला. काही जण गाफील राहिले, असे अजित पवार म्हणाले. एका माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >>> सत्यजित तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार? नाना पटोलेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले “आम्ही त्यांना…”

नेतृत्वाने स्वत:च्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास टाकला

“बंडखोरी झाल्यानंतर मुभा असल्यारखे ज्याला जिकडे जायचे तिकडे जा. ज्यांना इकडे थांबायचे असेल तर इकडे थांबा, असे वातावरण पाहायला मिळाले. मात्र वस्तुस्थिती काय याबाबत त्या पक्षाचेच वरिष्ठ जास्त अधिकारवाणीने सांगू शकतील. नेतृत्वाने स्वत:च्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला पूर्ण तडा देण्याचे काम करण्यात आले. काही जण गाफील राहिले, असे म्हणायला हरकत नाही,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे विधान, भाजपाचा उल्लेख करत म्हणाले; “आमचा एक नेता नेला, आम्ही नाशिकमधून…”

सरकारमधील प्रमुखांनी या गोष्टी का घडू दिल्या

“दीपक केसरकर, दादाजी भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील हे मंत्री वर्षा बंगल्यावर जात होते. चर्चा करत होते. मात्र आमच्या त्या वेळच्या सरकारमधील प्रमुखांनी या गोष्टी का घडू दिल्या, हे समजायला मार्ग नाही. आमच्या सरकारमधील गृहमंत्री, मला, शरद पवार यांना याचा अंदाज आला होता. जे काही चालू होते, ते झाकून राहू शकत नव्हते. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन, कुठे चुकत असेल तर दुरुस्त करणे गरजेचे होते. डोळे झाकू विश्वास टाकला गेला. त्याच विश्वासाला तडा बसला,” असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> MLC Election 2023 : भाजपाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीला मदत? नाना पटोलेंच्या विधानानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “अनेक नेत्यांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा महिन्यांपूर्वीच माझ्याही कानावर ते आले होते

“सहा महिन्यांअगोदरच माझ्या कानावर कुजबूज आली होती. माझी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठकांच्या निमित्ताने अनेकवेळा भेट व्हायची. यांना मी याबाबत सांगितले होते. ‘मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून घेतो. आमचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्याही कानावर ते आले आहे. आम्ही त्यातून मार्ग कढतो,’ असे त्यांनी मला सांगितले,” असा खुलासाही अजित पवार यांनी केला.