रविवारी (२९ जानेवारी) मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर हिंदू संघटनेकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात हजारो लोक सामील झाले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली. हा मोर्चा शिवाजी पार्क ते कामगार स्टेडियम दरम्यान काढण्यात आला होता. यावेळी या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मोर्चाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत काही महिला ‘धर्म छोड के जाओगी, तो तुकडों में बट जाओगी’, ‘अवैध मस्जिदे-अवैध कब्रस्थान लँड जिहाद के है यह निशाण’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

हेही वाचा- “बागेश्वर बाबाने तुकोबांबद्दलचं वक्तव्य मागे घेतलं, आता मुंबईत बसलेल्या बाबाला…” रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

घोषणा देणारे लोक महाराष्ट्रातील असूच शकत नाहीत, अशी शंका जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली आहे. तसेच संबंधित घोषणा देणाऱ्यांवर पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही, यावरून आश्चर्य व्यक्त केलं आहे. या मोर्चात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीसह डझनभर संघटना सामील झाल्या होत्या, याबाबतचं वृत्त ‘दैनिक भास्कर’ने दिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “आपल्या बहिणींचे तुकडे करू, अशा पद्धतीने धमक्या देणारे हे महाराष्ट्रातील असूच शकत नाहीत. पोलिसांनी या घोषणांची दखल घेतली नाही, याबाबत आश्चर्य वाटते. हे ऐकून असं वाटतं की, यांना फक्त दंगली घडवून आणायच्या आहेत. सरकारचे अपयश झाकण्यासाठी एवढेच करता येईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction on viral video hindu organisatiom morcha against love jihad and conversion in mumbai dadar rmm