MSBSHSE Maharashtra Board HSC 12th Class Result 2025 Highlights : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी बहुप्रतिक्षित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल सोमवारी (५ मे) जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील.

थेट निकाल पाहाण्यासाठी इथे क्लिक करा…

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांसह उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून, महाराष्ट्र राज्य मंडळाने नेहमीपेक्षा लवकर बारावीच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. त्यामुळे या परीक्षेचा निकालही लवकर लावण्यात येत आहे.

मुद्देतपशील
परीक्षेचे नावमहाराष्ट्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा २०२५
निकालमहाराष्ट्र HSC निकाल २०२५
परीक्षा आयोजित करणारी संस्थामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळmahresult.nic.in
लॉग इनसाठी आवश्यक तपशीलपरीक्षा क्रमांक आणि आईचे पहिले नाव
महाराष्ट्र HSC निकालाची तारीख५ मे २०२५, दुपारी १ नंतर
एकूण विद्यार्थ्यांची संख्यासुमारे १५ लाख विद्यार्थी
निकाल स्थितीजाहीर होणे बाकी आहे

Live Updates

Maharashtra Class 12th Result Highlights 5 May 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स 

11:47 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल यंदा सुमारे दीड टक्क्याने घटला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, त्यानुसार यंदा ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दीड टक्क्याने निकाल घटला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के, लातूर विभागाचा सर्वांत कमी ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. याचबरोबर यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

11:40 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: बारावीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे;

पुणे – ९१.३२

नागपूर – ९०. ५२

छत्रपती संभाजीनगर – ९२.२४

मुंबई -९२.९३

कोल्हापूर – ९३.६४

अमरावती – ९१.४३

नाशिक – ९१.३१

लातूर – ८९.४६

कोकण – ९६.७४

11:31 (IST) 5 May 2025
MAHA HSC Result 2025: बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलींचीच बाजी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ इतकी आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे.

11:26 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे.

11:24 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे.

11:18 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: यंदा बारावीचा निकाल ९१ टक्के, १३ लाख विद्यार्थी झाले उत्तीर्ण!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आजा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

10:04 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: ठाणे जिल्ह्यात एक लाख विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. १९७ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा पार पडली होती. ही परिक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्हास्तरावर चार भरारी पथक तैनात करण्यात आले होते. आता, आज जिल्ह्यातील किती विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

09:44 (IST) 5 May 2025

HSC Result 2025: एकाचवेळी बोर्डाची वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता! विद्यार्थ्यांनो डिजीलॉकरवरून क्षणात डाऊनलोड करा मार्कशीट; जाणून घ्या कशी

Maharashtra Board Result 2025 Marksheet Download : महाराष्ट्र एसएससी एचएससी निकाल २०२५ डाउनलोड करण्यासाठी डिजीलॉकर कसे वापरावे? …सविस्तर बातमी
08:54 (IST) 5 May 2025

Maharashta HSC Result 2025 : बारावीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिकवर…

Maharashtra Board HSC Result Update : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. याच निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. …सविस्तर बातमी
08:35 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC 12th Result 2025: आज बारावीचा निकाल लागणार, कसा पाहाल तुमचा निकाल? जाणून घ्या सोपी पद्धत

MSBSHSE Maharashtra Board Class 12th Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडली. आता संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. सविस्तर जाणून घ्या

08:34 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC Result 2025: निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांक आणि आईचे पहिले नाव आवश्यक

बारावीचा निकाल पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या परीक्षेचा क्रमांक आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आवश्यक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल डाऊनलोड करता येतील.

08:34 (IST) 5 May 2025

Best Courses For 12th Passed Students : बारावीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले? टेन्शन घेऊ नका; हे बेस्ट कोर्सेस निवडा

Best Courses for 12th students : तुम्हाला बारावीत कमी गुण मिळाले, तर टेन्शन घेऊ नका. चांगले क्षेत्र निवडून तुम्ही करिअर घडवू शकता. आज आपण बारावीत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले तरी कोणते चांगले कोर्सेस तुम्ही निवडू शकता, याविषयी जाणून घेणार आहोत. …वाचा सविस्तर
08:06 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC Result 2025: SMS द्वारे असा पाहा बारावीचा निकाल

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना एसएमएस द्वारेही हा निकाल पाहता येणार आहे. यासाठी, MHSSC असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा.

07:38 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC Result 2025 : यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा

महाराष्ट्र बोर्डाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षेला ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी बारावीची परीक्षा दिली होती.

07:34 (IST) 5 May 2025

बारावीचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, ५ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. …सविस्तर वाचा
07:33 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC Result 2025 Date प्रतीक्षा संपली, सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?

Maharashtra Board Class 12th Result 2025 Date : सोमवार दिनांक ५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. …सविस्तर बातमी
07:31 (IST) 5 May 2025

उद्या बारावीचा निकाल; ठाणे जिल्ह्यातील १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परिक्षा

ही परिक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्हास्तरावर चार भरारी पथक तैनात करण्यात आले होते. आता, उद्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. …वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. (Express File Photo)