Maharashtra Board Result 2025 Marksheet Download from Digilocker: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२वी चा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील. तसेच, निकाल digilocker.gov.in आणि hscresult.mkcl.org वर देखील उपलब्ध असतील.

महाराष्ट्र एसएससी एचएससी निकाल २०२५ डाउनलोड करण्यासाठी डिजीलॉकर कसे वापरावे?

विद्यार्थ्यांनी जाणून घ्या डिजिलॉकरवर डिजिलॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजिलॉकरवर १० वी आणि १२ वीचे निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर खाते असणे आवश्यक आहे.

MSBSHSE निकाल २०२५: डिजीलॉकर खाते कसे तयार करावे?

१. DigiLocker च्या साईटला भेट द्या – http://www.digilocker.gov.in
२. इनपुट फील्डसह एक नवीन विंडो उघडेल
३. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि नंतर ‘Continue’ बटणावर क्लिक करा
४. या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. नवीन विंडोमध्ये दिलेल्या जागेत हा OTP भरा.
५. नंतर ‘Verify’ बटणावर क्लिक करा.
६. लिंक नवीन विंडोवर पुनर्निर्देशित केली जाईल
७. खात्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड सेट करा
८. पासवर्डमध्ये वापरकर्त्याचं नाव नसावं
९. शेवटी, तुमचा आधार क्रमांक सबमिट करा आणि तो OTP किंवा फिंगरप्रिंट पर्यायाद्वारे सेट करा.
१०. तुम्ही आता डिजिलॉकर ॲपवर यशस्वीरित्या साइन अप केले आहे.

Direct link to check Maharashtra HSC Result 2025

महाराष्ट्र एचएससी एसएससी निकाल 2025: डिजीलॉकरवरून महाराष्ट्र १०वी १२वीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

१.युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजिलॉकर ॲपवर लॉग इन करा
२. ‘प्रोफाइल’ पेजवर जा आणि आधार क्रमांक सिंक करा. डिजीलॉकर खाते आधीपासून आधार क्रमांक वापरून तयार केले असल्यास, पुन्हा करण्याची गरज नाही.
३. डाव्या साइडबारमधील ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ बटणावर क्लिक करा.
४. पुढील स्क्रीनवर दोन ड्रॉपडाउन असतील.
५. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये, ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
६. पुढील ड्रॉप-डाउनमध्ये, मार्कशीट निवडा म्हणजे HSC/ SSC मार्कशीट/ स्थलांतर किंवा उत्तीर्ण इ.
७. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी ॲडमिट कार्ड/महाराष्ट्र एचएससी ॲडमिट कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोल नंबर यासारखे आवश्यक तपशील भरा.
८. ‘Get Document’ वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र HSC/Maharashtra SSC डिजिटल मार्कशीट/प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
९. ही कागदपत्रे डिजीलॉकर खात्यात सेव्ह करण्यासाठी सेव्ह टू लॉकर बटणावर क्लिक करा.

डिजिलॉकर ॲप काय आहे?

  • डिजीलॉकर हे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने आपल्याजवळ बाळगण्याचे आणि पडताळणीसाठी भारत सरकारचे क्लाउड-आधारित व्यासपीठ आहे. उमेदवार खालील उद्देशांसाठी DigiLocker वापरू शकतात:
  • कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे यामध्ये तु्म्ही ठेवू शकता.
  • कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सामायिक करु शकता

डिजीलॉकर वापरण्याचे फायदे

शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीट व्यतिरिक्त आधार कार्ड, कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. आपण या अॅपवर एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, रेशनकार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता.आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या लॉकरमध्ये ठेवली जाऊ शकतात.