Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 18 July : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तसेच गुरुवारी (१७ जुलै) विधीमंडळ परिसरात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आज अधिवेशनात याच मुद्द्याभोवती चर्चा होताना दिसत आहे. यासंबंधीच्या बातम्यांच्या आढावा आपण घेणार आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावरून रायकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील व देशभरातील महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
“शहाणपणा करू नका, सांगतोय तुम्हाला…”, रोहित पवार पोलिसांवर भडकले; म्हणाले, “आमदाराला हात…”
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झालं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी मविआ नेत्यांनी केली आहे. विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीवरून महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर आज अक्कलकोट बंद
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर आज मराठा संटनांनी अक्कलकोट बंदची हाक दिली आहे. यानिमित्त मराठा संघटना व संभाजी ब्रिगेडने संयुक्त मुक मोर्चा काढला.
विधान भवन परिसरातील राडा प्रकरण : देशमुख व टकलेला दुपारी किल्ला कोर्टात हजर करणार
विधान भवन परिसरातील राड्याप्रकरणी नितीन देशमुख व टकले या दोघांना अटक, आज दुपारी किल्ला कोर्टात हजर करणार.
विधान भवनातील हाणामारीवरून कॉमेडियन कुणाल कामराने पोस्ट केला व्हिडीओ, ‘कायदे मोडणारे’ असे कॅप्शन देत महायुतीवर टीका
विधानभवनातील राड्याबाबत राज ठाकरेंचे आव्हान- थेटच म्हणाले, स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा, अन्यथा…
कार्यकर्ते राडा करत असताना त्यांना रोखलं का नाही? पडळकर म्हणाले, “त्या नितीन देशमुखला…”
कार्यकर्ते विधीमंडळात राडा करत असताना त्यांना तुम्ही रोखलं का नाही? असा प्रश्न वार्ताहरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना विचारल्यावर ते म्हणाले, ठीक आहे या विषयावर नंतर बोलू. आमच्या कार्यकर्त्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. विधीमंडळात जे काही घडतं, त्यानंतर झालेली कारवाई हे सगळं विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींच्या अखत्यारित येणारे विषय आहेत. मी त्यावर काही बोलू शकत नाही. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. तसेच ज्या नितीन देशमुखला मारहाण झाली त्याला मी ओळखतही नाही.
विधीमंडळातील राडा प्रकरण, विधानसभा अध्यक्ष दुपारी दिड वाजता बोलणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “विधीमंडळात झालेल्या हाणामारीवरील कारवाईबाबत दुपारी दिड वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर बोलणार.”
