Mumbai Maharashtra Monsoon Updates, 27 June 2025 : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यतील राजकीय क्षेत्रातून विरोध केला जात आहे. याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात एल्गार केला आहे. हिंदी सक्तीविरोधातील मराठी भाषाप्रेमींच्या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आंदोलनाची हाक दिली आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. याविषयीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील इतर राजकीय व सामाजिक घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.
Maharashtra Latest News Live Today : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.
तहसीलदारपदी नियुक्तीच्या नावाखाली युवकाची फसवणूक
शिक्षणमंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत! आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास! हे सरकार चालवत आहेत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही ‘नापास’ होतील!
शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 27, 2025
आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास!!!
हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही 'नापास'… https://t.co/i4ndqO9u9Q
मान-सन्मान व सोहळ्यांवेळी पुढे सरसावणारे कलाकार-खेळाडू अशा वेळी गप्प का बसतात? मनसे नेत्याचा प्रश्न
मान-सन्मान आणि सोहळ्यांवेळी पुढे सरसावणारे कलाकार आणि खेळाडू अशा वेळी गप्प का बसतात?
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 27, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर
यांचा परखड प्रश्न.#मराठी #महाराष्ट्र #हिंदी_सक्ती #MNSAdhikrut pic.twitter.com/8kZn66ZE26
निसर्ग सौंदर्य खुलले, चिखलदरा पर्यटकांनी बहरले…
“त्याला मराठी माणूस जाम चोपेल”, अविनाश जाधवांचा सदावर्तेंवर संताप
हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चाबाबत शिवसेनेचे (ठाकरे) नेते अविनाश जाधव म्हणाले, “५ जुलै रोजी न भुतो नव भविष्यती असा मोर्चा काढू”. या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यांच्यावर हल्लाबोल करत अविनाश जाधव म्हणाले, “आमची भाजपाला विनंती आहे की त्यांनी सदावर्तेच्या तोंडावर पट्टी बसवावी. अन्यथा मराठी माणूस त्याला जाम चोपेल”.
अडकलेले पक्षी आणि प्राण्यांच्या बचावासाठी दरवर्षी पाच हजार तक्रारी, अग्निशमन दल खरेदी करणार अत्याधुनिक पोल्स
मुंबई : बंद पडलेल्या मराठी शाळेत कापडाची दुकाने, सरकारी जागेचा व्यावसायिक वापर
‘धर्मनिरपेक्ष’ला ‘पंथनिरपेक्ष’,‘श्रद्धे’ला ‘धर्म’ छापले, समरसता शब्दाचा…
नवी मुंबई : शहरात भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या २१११ इमारती, महापालिकेचा कारवाईचा इशारा
अमरावती पोलिसांचा ‘मास्टरप्लॅन’, अमली पदार्थांची तस्करी…
VIDEO : समृद्धी महामार्ग : मेहकरजवळ रस्ता पाण्याखाली, पहिल्याच पावसाने घेतले दोघांचे बळी
पुणे : सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू
भूतबाधा झाल्याचे सांगत अल्पवयीन मुलाला चटके आणि बेदम मारहाण, भांडुपमधील घटना
मोर्चासाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू राजकारणात हात मिळवणार? संजय राऊतांचं सूचक उत्तर
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजीच्या मोर्चाला पाठिंबा दिला. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. आम्हाला त्याविषयी कल्पना नव्हती. मात्र, या दोन्ही घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला. ते म्हणाले, ‘मला तुमच्या मोर्चाची कल्पना नव्हती. मात्र, अशा पद्धतीने मराठी भाषेसाठी दोन-दोन मोर्चे निघणं बर दिसतं नाही. एकत्र आंदोलन झालं तर त्याचा मोठा प्रभाव दिसू शकतो’. मी त्यावर आमच्या पक्षप्रमुखांशी चर्चा केली. उद्धव ठाकरे त्यावर आढेवेढे न घेता म्हणाले, ‘माझीही वेगळ्या मोर्चाची भूमिका नाही. मात्र ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण होईल’. ही गोष्ट मी राज ठाकरे यांच्या कानावर घातली”.
पाडकामासाठी येणाऱ्या खर्चापैकी १० टक्के रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करा, उच्च न्यायालयाची ठाणे महानगरपालिकेला सूचना
अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ३० जूनला
लीलावती रुग्णालय ट्रस्ट -एचडीएफसी व्यवस्थापकीय संचालक वाद; शशिधर जगदीशन यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून तीन खंडपीठांची माघार
PRADA Chappal Row: “उल्हासनगरमध्ये मेड इन USA…”, शरद पवारांच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये पिकला हशा!
कमावती महिलाही पोटगीसाठी पात्र, कुटुंब न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेपात उच्च न्यायालयाचा नकार
नितेश राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, राऊत यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला
काेल्हापूर खंडपीठ स्थापनेस समर्थन, सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांची भूमिका
पुणे: नीलायम चित्रपटगृहासमोर ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकाविली
ठाणे: मुजोर रिक्षाचालकांना लगाम ! प्रवाशांसाठी ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा
एकच मोर्चा निघणार : संदीप देशपांडे
संदीप देशपांडे म्हणाले, या सरकारला मराठी माणसाची ताकद दिसणं आवश्यक आहे. महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत असेल तर आपण सर्वांनी सरकारच्या अंगावर जाणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी तशी भूमिका मांडली आणि आम्ही त्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात एकच मोठा मोर्चा निघावा असं राज यांनी म्हटलं आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत.