Mumbai Maharashtra Monsoon Updates, 27 June 2025 : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यतील राजकीय क्षेत्रातून विरोध केला जात आहे. याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात एल्गार केला आहे. हिंदी सक्तीविरोधातील मराठी भाषाप्रेमींच्या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आंदोलनाची हाक दिली आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. याविषयीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील इतर राजकीय व सामाजिक घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Latest News Live Today : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.

10:21 (IST) 27 Jun 2025

करोना मृत्यू सानुग्रह अनुदानाचा दुहेरी लाभ घेतलेल्यांवर संकट; १३७ प्रकरणात रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही

करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबातील नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. …सविस्तर वाचा
10:02 (IST) 27 Jun 2025

हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा एकच मोर्चा; संजय राऊतांची मोठी घोषणा

दोन्ही भावांनी मराठीसाठी भूमिका घेतली आहे. मराठीसमोर, महाराष्ट्रासमोर आमचं भांडण मोठं नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. पाठोपाठ उद्धव ठाकरे म्हणाले, मराठीच्या व महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे उभे राहतील त्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे. त्यानंतर आता हिंदी सक्तीविरोधात मराठी माणूस एकवटताना दिसतोय. आता मराठी माणसाच्या एकजुटीची गरज आहे. राजकारण्यांचा खेळ मोडून काढला पाहिजे.

09:41 (IST) 27 Jun 2025

मराठी माणसाच्या एकजुटीची गरज : खासदार अरविंद सावंत

दोन्ही भावांनी मराठीसाठी भूमिका घेतली आहे. मराठीसमोर, महाराष्ट्रासमोर आमचं भांडण मोठं नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. पाठोपाठ उद्धव ठाकरे म्हणाले, मराठीच्या व महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे उभे राहतील त्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे. त्यानंतर आता हिंदी सक्तीविरोधात मराठी माणूस एकवटताना दिसतोय. आता मराठी माणसाच्या एकजुटीची गरज आहे. राजकारण्यांचा खेळ मोडून काढला पाहिजे.

09:39 (IST) 27 Jun 2025

५ जुलै रोजी मनसे व शिवसेनेचा (ठाकरे) एकत्र मोर्चा निघणार : संदीप देशपांडे

संजय राऊतांपाठोपाठ मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी देखील दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा निघेल असं स्पष्ट केलं आहे. पाच जुलै रोजी हा मोर्चा निघेल असं देशपांडे यांनी सांगितलं आहे.

09:30 (IST) 27 Jun 2025

महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यासाठी ५ जूलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजी मराठी भाषाप्रेमींनी आझाद मैदानात आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मोर्चात दिसू शकतात. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक सूचक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की राज्यात हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा निघेल.

09:26 (IST) 27 Jun 2025

हिंदी सक्तीविरोधात दोन्ही बंधूंचा एकच मोर्चा?

महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! – संजय राऊत