Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. मराठा आरक्षणापासून ते राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्यापर्यंत अनेक घडामोडींची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आज दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात होणाऱ्या पाच मेळाव्यांकडे आणि प्रमुख नेत्यांच्या भाषणांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचे मेळावे असतील.
यात नेमक्या काय भूमिका मांडल्या जाणार? यावर पुढील काही दिवसांमधील राज्यातील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.
Dasara Melava 2025 Maharashtra महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे, प्रमुख नेत्यांच्या भूमिकांकडे लक्ष!
शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ : तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात
पुण्यातील ७० हजार खांब हलविणार… काय आहे कारण?
हे तर ईश्वरी कार्य… वयोवृद्ध संघ स्वयंसेवक बन्शीभाऊ कांकरिया यांची धारणा
शिंदे गटाच्या माजी महापौरामुळे गुलाबराव पाटील यांचे राजकारण धोक्यात…!
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले “संघाची खरी ओळख रज्जू भैयांमुळे”
संघ शताब्दी : जळगावमधील ९१ वर्षीय परशुराम झारे यांचा स्वयंसेवक ते नगराध्यक्ष प्रवास…!
दिबांच्या नावाच्या शैक्षणिक संकुलाचे स्वप्न साकार होणार, उरण मधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नामकरण फलकाचे उदघाटन
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: धर्म विचारून हत्या करण्याच्या घटनेने कोण शत्रू आणि कोण मित्र हे शिकवले- सरसंघचालक
संघाच्या शताब्दी उत्सवाला ॲड. सातपुते प्रमुख पाहुणे; कुणबी समाजातून विरोध; उपस्थित राहू नये : पदाधिकारी, नेत्यांचा दबाव
नक्षलवादाच्या कठोर कारवाईवर सरसंघचालक काय म्हणाले?, सरकार आणि प्रशासनाने आता…
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंची शेरोशायरी
हर मुश्किल को हसते हसते
झेलते है हम
अँधियों में भी चिराग जला कर
चलते है हम…
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंची शेरोशायरी
आग तो लगी थी घर में
दोस्त ने आके पूछा
घर में आग लगी है तो बचा क्या है
मैंने दोस्त से कहा, मैं बचा हूँ
तो दोस्त ने कहा
अगर तू बचा है, तो जला क्या है?
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण
माझ्याविरोधातला घोटाळा काढला. न्यायालयानं मला क्लिनचिट दिली. पण जे कोर्टात गेले त्यांना एक लाखाचा दंड केला. पण एवढं होऊनही मी आजही शिक्षा भोगतोय. ना मी कुणाला विरोध केला ना मी कुणाच्या विरोधात आहे – धनंजय मुंडे, आमदार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची लगबग; रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांचे रंगकाम
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण
मराठा आरक्षणाच्या चळवळीतही आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसींमधून आरक्षण घ्यायचंय. एमपीएससीच्या निकालात ओबीसीचं कटऑफ ४८५ आलं. विशेष मागास वर्गाचा कटऑफ होता ४५०. मला विशेष मागास वर्गात ४५० वर प्रवेश मिळाला असता. पण ओबीसीत आल्यानंतर ४८० गुण मिळाले तरी प्रवेश मिळणार नाही. कुणाला फसवताय तुम्ही? काही ठराविक लोकांना फक्त यातून खुर्ची मिळावी अशी अपेक्षा आहे. आरक्षण दिलंय. पण याच्या ताटातलं काढून त्या ताटात दिलं जातंय – धनंजय मुंडे, आमदार
काहीजण म्हटले गोपीनाथ मुंडेंचं आता सगळं संपलं. अनेकजणांना हे ऐकायचंय कारण मी बरेच दिवस झाले बोललोच नाही. मैने सोचा इस सफर में खामोश रहना ही ठीक है. ना कुछ करते हुए बिना वजह गालियाँ खाई है. पण विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळी आरक्षणाचा मुद्दा आला, त्या त्या वेळी त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी कार्यकर्ता आहे – धनंजय मुंडे, आमदार
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: भक्तीगडावरून धनंजय मुंडेंचं भाषण
हा मेळावा होण्यासारखी परिस्थिती काही दिवसांपूर्वी नव्हती. अभूतपूर्व असा पाऊस आला. शेतकऱ्यांवर भयंकर संकट ओढवलं. माझी आणि ताईची चर्चा झाली की काय करायचं? पण ताईंनी सांगितलं की काहीही झालं तरी या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही. शेतकरी आज अडचणीत आला आहे. अभूतपूर्व नुकसान झालंय हे मान्य करतो. आज मी मंत्रीमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रीमंडळात आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून देतील – धनंजय मुंडे, आमदार, भारतीय जनता पक्ष
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: संघाच्या शस्त्रपूजनात ड्रोन आणि पिनाका अग्निबाण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांचे ऐतिहासिक संबंध : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Pankaja Munde Bhaktigad Dasara Melawa: थोड्याच वेळात पंकजा मुंडेंचं भाषण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणानंतर आता दिवसातल्या दुसऱ्या दसरा मेळाव्याची अर्थात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच भक्तीगडावर हा मेळावा होत असून त्यात दोघे भाषण करणार की फक्त पंकजा मुंडेंचच भाषण होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
RSS 100 Years Dasara Melava Nagpur: वांगचुक यांच्या अटकेवर भागवत यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले ” परिवर्तन हिंसेने नव्हे तर…”
Maharashtra Dasara Melava 2025 LIVE: संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले “महात्मा गांधी…
Maharashtra Dasara Melava 2025 LIVE: संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले “महात्मा गांधी…
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे. त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळालं. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी पूर्वजांनी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचं आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवाकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्त हे सगळं मिळून आपलं राष्ट्रीयत्व तयार होतं. सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती आपली राष्ट्रीयता आहे. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे. त्यांनी हिंदवी म्हणावं, भारतीय म्हणावं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयतेचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे हिंदू. आपलं राष्ट्र राज्यावर आधारित नव्हतंच कधी. नेशन-स्टेट आपल्याकडे नव्हतं. आपली संस्कृती राष्ट्र बनवते. राज्य येतात-जातात. राष्ट्र कायम असतं. सर्व प्रकारचे चढउतार आपण पाहिले. गुलामगिरीही पाहिली, स्वातंत्र्यही पाहिलं. त्यामुळे हिंदू समाजाचं प्रबळ होणं, शीलसंपन्न होणं, संघटित होणं देशाच्या एकता व विकासाची गॅरंटी आहे. हिंदू समाज सनातन काळापासून इथे आहे. या देशाचा तो एक जबाबदार समाज आहे. वसुधैव कुटुंबकमच्या उदार विचारधारेचा संरक्षक हाच समाज राहिला आहे. जगाच्या विकासात योग्य ते योगदान देणारा देश भारताला बनवणं याची जबाबदारी व कर्तव्य हिंदू समाजाचं आहे.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
दुसरं म्हणजे कोणत्याही देशाला आदर्श व्हायचं असेल तर समाजात एकता असायला हवी. युनायडेट वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. आपला देश विविधतांचा देश आहे. मधल्या काळात आक्रमणं झाली. विदेशी लोक भारतात आले. अनेक कारणांनी इथल्या लोकांनीही त्यांच्या विचारधारांचा स्वीकार केला. ते विदेशी निघून गेले पण त्यांचे विचार पाळणारे काही देशबंधू देशात आहेत. सुदैवाने भारताची परंपरा सर्व प्रकारच्या विचारधारांचा स्वीकार करते. त्यामुळे बाहेरून आलेल्या विचारसरणींना आपण परके मानत नाही. आपण सगळ्या वैशिष्ट्यांना मानतो, स्वीकारतो, आपली वैशिष्ट्येही त्यांच्या बरोबरीच्या मानतो. ही वैशिष्ट्ये भेदभावाला कारणीभूत ठरणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आज देशात याच विविधतांना भेदभावाचं कारण बनवल्या जात आहेत. आपापली वैशिष्ट्ये आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. पण असं असलं, तरी आपण सगळे एका मोठ्या समाजाचे भाग आहोत. समाज, देश, संस्कृती व राष्ट्राच्या नात्याने आपण एकच आहोत. आपण वेगळे नाहीत. विविधता भाषा, पंथ संप्रदाय, खानपान, राहण्याची ठिकाणं यावर आहेत. त्यामुळे या एकतेमुळे आपलं परस्परांशी वागणं सद्भावनेचं असायला हवं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. पण आपण एकमेकांच्या चालीरीतींचा अवमान करणार नाही याची चिंता सगळ्यांनी करायला हवी. कुणी एकानं हे करून भागणार नाही. अनेक भांडी सोबत ठेवली तर कुठेतरी आवाज होतोच. एवढे सगळे समाज एकत्र असल्यावर कुठेतरी आवाज होऊच शकतो. पण असं झालं तरी नियमांचं पालन करणं, व्यवस्थेचं पालन करणं, सद्भावपूर्ण आचरण करणं कायम ठेवलं पाहिजे. लहान-सहान गोष्टींवर कायदा हातात घेणं, रस्त्यावर उतरणं, गुंडगिरी करणं हे योग्य नाही. कुठल्या समाजाला भडकवण्यासाठी शक्तीप्रदर्शन कऱणं हे ठरवून केलं जातं. त्यापासून लांब राहायला हवं. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. अशा गोष्टींना थांबवायला हवं. शासन-प्रशासनाने आपलं काम कोणत्याही भेदभावाशिवाय, कुठल्याही दबावाशिवाय नियमानुसार करायला हवं. पण समाजाच्या युवा पिढीला, सदसदविवेकबुद्धीला सतर्क राहायला हवं. गरज पडेल तेव्हा मध्यस्थीही करावी लागेल. कारण अराजकतेला थांबवावंच लागेल.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
व्यवस्था बनवणारा समाज असतो, मनुष्य असतो. तो जसा असतो, तशीच व्यवस्था होते. समाजाच्या आचरणात बदल आला, तर व्यवस्थेत बदल होईल. व्यवस्था स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यास इच्छुक नसते. समाजाला ते करावं लागतं. आणि समाजात भाषणं, पुस्तकांमधून परिवर्तन होत नाही. प्रबोधन करावंच लागतं. पण प्रबोधन करणाऱ्यांना जो बदल घडवायचाय, तो त्यांना स्वत:च्या आयुष्यात आणून उदाहरण घालून द्यावं लागतं. असे स्थानिक नेतृत्व देणारे व्यक्ती असायला हवेत. असे व्यक्ती तयार करावे लागतात. त्यामुळे व्यक्ती निर्माणातून समाज परिवर्तन व समाज परिवर्तनातून देश परिवर्तन हा संघाचा विचार आहे. सर्व समाजांमध्ये असेच बदल घडतात.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण…
राष्ट्रीय स्वयंसेव संघ गेल्या १०० वर्षांपासून अशाच प्रकारच्या चिंतनावर काम करत आहे. समाजाच्या सर्व पातळ्यांवर स्वयंसेवक सक्रीय आहेत. या सगळ्यांच्या अनुभवाच्या आधारावर संघाचं एक चिंतन आहे. पहिली गोष्ट म्हणजे जगाच्या व्यवस्थेत परिवर्तन गरजेचं आहे. पण आपण एका विपरीत व्यवस्थेत इतके पुढे गेलो आहोत की आता एकदम मागे वळलो तर गाडी उलटी होईल. त्यामुळे हळूहळू लहान लहान पावलं उचलून आपल्याला वळावं लागेल. एक मोठा वळसा घालून मागे यावं लागेल. परिस्थितीची जाणीव ठेवून आपण आपल्या समग्र दृष्टीच्या आधारावर आपला विकासमार्ग निश्चित करून जगासमोर एक यशस्वी उदाहरण ठेवू. अर्थ व कामाच्या मागे अंध होऊन पळणाऱ्या जगाला धर्माची दृष्टी द्यावी लागेल. तो धर्म पूजा, प्रार्थना, प्रथा नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांना विकसित करणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, प्रजेच्या विकासाची धारणा करणारा हा धर्म आहे. या धर्माचा मार्ग आपल्याला आपल्या उदाहरणाने जगाला दाखवावा लागेल. भारताला हे करावंच लागेल असं संघाचं मत आहे.
RSS 100 Years Dasara Melava Nagpur : बौद्ध गुरू दलाई लामा यांचा संघाविषयी विशेष संदेश, संघ समर्पण आणि…
RSS 100 Years Dasara Melava Nagpur : विदेशी पाहुणे घेणार संघाचे बौद्धिक, भाषांतर करणाऱ्या विशेष हेडफोनची सुविधा
RSS 100 Years Dasara Melava Nagpur : सरसंघचालकांकडून संघ ध्वज वंदन, पथसंचलनाला सुरुवात
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी सर्वात मोठे आव्हान कोण? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी मीच मोठे आव्हान आहे.
Dasara Melava 2025 Maharashtra LIVE, 02 October 2025: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.