Maharashtra Breaking News Updates, 25 May : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मंगळवारी नव्या रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला. मुंबईत मंगळवारी २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३० पर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरही करोनासंदर्भातील आकडेवारी वाढतानाचं चित्र दिसत आहे. एकीकडे करोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढतंय की काय अशी शंका असतानाच मंकीपॉक्सने युरोपीयन देशांमध्ये दहशत निर्माण केलीय.
राजकीय वर्तुळामध्ये सध्या छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. संभाजीराजांचे अद्याप तळयात -मळयात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले असून यावरुन आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
आंध्र प्रदेशातील अमलापूरम शहरात संतप्त आंदोलकांना मंत्र्यांचं घर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने राज्याचे वाहतूक मंत्री पी विश्वरुप यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून दिलं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी https://t.co/uiNMszB7KB #AndhraPradesh
— LoksattaLive (@LoksattaLive) May 25, 2022
अमेरिकेतील टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय हल्लेखोराने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन शिक्षक १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केलं आहे. तसंच आपण केव्हा या गन लॉबीविरोधात उभं राहणार आहोत? अशी विचारणा केली आहे.
Texas School Shooting: १८ वर्षीय हल्लेखोराने आधी आजीला घातली गोळी, नंतर शाळेत जाऊन अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू https://t.co/QwFg5QOquA #USA #Texas #TexasSchoolMassacre #JoeBiden
— LoksattaLive (@LoksattaLive) May 25, 2022
तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. याच दुर्घटनेवरुन आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर आणि खास करुन राज्याच्या पर्यटनमंत्र्यांवर म्हणजेच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना या दोन पर्यटकांचा जीव वाचू शकला असता असं म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त
शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला जात असल्याचा दावा करत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त
वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
डेव्हिड मिलर (३८ चेंडूंत नाबाद ६८ धावा) आणि कर्णधार हार्दिक पंडय़ा (२७ चेंडूंत नाबाद ४०) यांच्या दिमाखदार खेळींमुळे गुजरात टायटन्सनी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आपल्या पहिल्याच पर्वात गुजरातच्या संघाने थेट अंतिम फेरी गाठण्यामध्ये डेव्हिड मिलरने मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यानंतर मिलरने केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. वाचा सविस्तर वृत्त
छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळय़ात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले. येथे वाचा सविस्तर वृत्त
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.