Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सभागृहाबाहेर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा होत आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसानंही राज्यभर जोरदार हजेरी लावल्याचं दिसत आहे.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी…

11:53 (IST) 8 Jul 2025
Mira-Bhayander Morcha: पोलिसांमध्ये हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी – प्रताप सरनाईक

काही कार्यकर्त्यांना आज तडीपारीच्या नोटिसा दिल्या. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मीरा भाईंदरचे डीसीपी प्रकाश गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली. कालपासून पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली असेल, तर ती त्यांना द्यायला हवी. पोलिसांची दादागिरी चालणार नाही. मी त्याचा निषेध व्यक्त करतो. आता मी स्वत: त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल, तर त्यांनी मला अटक करून दाखवावी – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

11:42 (IST) 8 Jul 2025

भाईंदर : रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या तबेले धारकांवर पालिकेकडून गुन्हा दाखल

अनेक वेळा ही जनावरे रस्त्याच्या मध्येच बसत असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. …अधिक वाचा
11:35 (IST) 8 Jul 2025

गुप्तधनासाठी अघोरी कृत्य : अल्पवयीन मुलीस चटके, आईलाही बंदिस्त ठेवले

वंजारी फैल परिसरातील घरावर छापा टाकताच, पूजा करत असलेल्या व्यक्तीने धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. …सविस्तर वाचा
11:30 (IST) 8 Jul 2025

शुल्क न भरल्याने मुलीची आत्महत्या ? पण आमदार म्हणतात…

वडील शेतमजुरी करतात तसेच अधिकचे दोन पैसे मिळावे म्हणून इतरांची शेती पण मक्त्याने करतात. …सविस्तर बातमी
11:25 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander Morcha: आता आम्हाला बघायचंच आहे की… – संदीप देशपांडे, मनसे नेते

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त मार्ग बदलायला सांगत होतो. पण मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते. ही घटना घडली मीरा रोडवर, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडवर आणि आम्हाला सांगत होते मोर्चा घोडबंदर रोडला काढा. मीरा रोडच्या घटनेसाठी कुणी घोडबंदर रोडवर मोर्चा काढतं का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावरही गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कुठे नाही म्हटलं. अशा खोट्या समजुती पसरवू नका. महाराष्ट्रभरातून मराठी माणूस मीरारोडच्या दिशेनं निघाला आहे. आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या तुरुंगात जागा जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत तुम्ही मोर्चाची परवानगी देत नाही, तोपर्यंत चालू राहणार – संदीप देशपांडे, मनसे नेते

11:04 (IST) 8 Jul 2025

Devendra Fadnavis on Mira-Bhayander Morcha: मीरारोड प्रकरणात राजकारण होतंय?

मला महाराष्ट्राचा स्वभाव माहिती आहे. असे प्रकार इथे चालणार नाहीत. मराठी माणूस मोठ्या मनाचा आहे. भारतावर आक्रमण झाला, तेव्हा मराठी माणसानं फक्त महाराष्ट्राचा विचार केला नाही, संपूर्ण भारताचा विचार केला. त्यामुळे मराठी माणूस कधीही संकुचित विचार करणार नाही. कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न जरी करत असेल, तरी ते यशस्वी होणार नाहीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</p>

11:01 (IST) 8 Jul 2025
Devendra Fadnavis on Mira-Bhayander Morcha: मनसेला मोर्चाची परवानगी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

मी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही? कारण कुणीही मोर्चासाठी परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. पण आयुक्तांनी सांगितलं की ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, की तिथे संघर्ष होईल. काही लोकांना वेगळी काही कारवाई करायची आहे असं पोलिसांना समजलं. पोलीस सांगत होते तो मार्ग त्यांना मंजूर नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली. कुणालाही मोर्चा काढायचा असेल, तर ती परवानगी मिळेल. पण अमुकच मार्गाने मोर्चा काढायचाय असं सांगून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. आपल्याला राज्यात एकत्र राहायचं आहे. योग्य मार्ग दिला, तर मोर्चाला कधीही परवानगी मिळेल – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

10:55 (IST) 8 Jul 2025

भंडारा ग्रामीण रुग्णालयातील प्रसूतिगृह व्हरांड्यात पाणीगळती ; नव्याने बांधकाम केलेल्या…

लाखनीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जोन्नती देऊन ग्रामीण रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आले. …सविस्तर वाचा
10:13 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander MNS Morcha: मीरा रोड परिसरात जमावबंदी

मीरारोड परिसरात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चासाठी या भागात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

10:12 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander MNS Morcha: मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरदेखील पक्षाकडून मोर्चासाठी तयारी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतलं.

10:11 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander MNS Morcha: मनसेच्या मोर्चाला पोलिसांचा नकार

मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. याविरोधात मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत घडलेला प्रसंग (फोटो – महाराष्ट्र विधानसभा लाईव्ह स्क्रीनग्रॅब)

Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा