Today’s Live News Update, 27 December 2023: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आमचा लढा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसंच मुंबईतल्या आंदोलनाची दिशा आपण गुरुवारी स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला राम मंदिराच्या पूजेचं आणि उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नसल्याने संजय राऊत यांनी मंगळवारप्रमाणे आजही भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Marathi News Live Updates | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक

11:51 (IST) 27 Dec 2023
खासदार रामदास तडस म्हणतात,’ बचत गट भवन हे’ या ‘ आमदाराचं देणं…’

वर्धा : महिला बचत गट भवनाची संकल्पना मांडून आमदार डॉ.पंकज भोयर यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ दिले, अशी पावती खा.रामदास तडस यांनी दिली आहे.राज्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. यामाध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.

सविस्तर वाचा

11:51 (IST) 27 Dec 2023
आगळावेगळा निरोप समारंभ! श्वान ग्रेसी आणि सिंबा यांना भावपूर्ण सेवानिवृत्ती

चंद्रपूर: पोलीस दलात नेहमी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला जातो. परंतु चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने श्वानपथकातील निवृत्त झालेल्या शोधांना निरोप समारंभ आयोजित करत श्वान ग्रेसी आणि सिंबा या मुक्या शिलेदारांना मानाची सलामी दिली.

सविस्तर वाचा

11:48 (IST) 27 Dec 2023
मुंबई: हॉटेलच्या वाहन चालकाने केली मोटरीतून दागिन्यांची चोरी; संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश; आरोपीला अटक

मुंबई: हॉटेलच्या वॅलेट पार्किंगमधील वाहन चालकाने मोटरगाडीतील दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात बोरीवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 27 Dec 2023
गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याणमध्ये १९ हजार घरांची निर्मिती होणार!

मुंबई: गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने (म्हाडा) जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे तसेच कल्याणजवळ सुमारे ५४ एकर भूखंडाची राज्याच्या महसूल विभागाकडे मागणी केली गेली आहे.

सविस्तर वाचा…

 

मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. तसंच आता मुंबईतून मोर्चा काढला जाणार आहे. त्याची दिशा आपण उद्या स्पष्ट करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.