Maharashtra Politics LIVE Updates: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या चालू असून प्रमुख आरोपी वाल्मिक कराडवर सध्या सगळ्यांचंच लक्ष केंद्रीत झालं आहे. वाल्मिक कराडचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून त्यात खंडणी मागण्यासाठी जाताना वाल्मिक कराडसोबत इतर आरोपीही दिसत आहेत. एकीकडे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे सैफ अली खानवरील हल्ला आणि त्याचा हल्लेखोर यासंदर्भात मोठी चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
Marathi Live News Update Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
अभिनेता सैफ अली खान पाच दिवसांनी रुग्णालयातून घरी परतला. मात्र, तो इतक्या लवकर कसा बरा झाला? असा प्रश्न एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. “डॉक्टरांचं म्हणणं होतं की सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंचापर्यंत चाकू घुसला होता. बहुधा आतच अडकला होता. सलग सहा तास ऑपरेशन चाललं. हे सगळं १६ जानेवारीला घडलं. २१ जानेवारीला सैफला डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून निघताच सैफ इतका फिट? फक्त पाच दिवसांत? कमाल आहे!” असं एक्सवरील पोस्टमध्ये संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. चार दिवसांत एवढी प्रकृती ढासळलेली व्यक्ती अशा प्रकारे रुग्णालयातून बाहेर पडली जणू काही शूटिंगसाठी निघाली आहे. हे शक्य आहे का? करीना सांगते की तो त्यांचा खासगी प्रश्न आहे. पण तो तसा नाही. हा देशाचा मुद्दा आहे. कारण तुमच्या घरात हा प्रकार घडला आहे., अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी एबीपीशी बोलताना दिली.
डॉक्टरों का कहना था कि
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 21, 2025
सैफ अली खान की पीठ में 2.5 इंच अंदर तक चाकू घुसा था।
संभवत: अंदर ही फँसा था।
लगातार 6 घंटे ऑपरेशन चला।
यह सब 16 जनवरी की बात है।
आज 21 जनवरी है।
अस्पताल से निकलते ही इतना फिट ?
सिर्फ़ 5 दिन में ?
कमाल है !#SaifAliKhan pic.twitter.com/7tCT9g0jx8
अभिनेता सैफ अली खान. (Photo- PR Handout)