Maharashtra Breaking News 10 August 2023: महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो केंद्रातला अविश्वास प्रस्ताव. मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून स्वतःचं वस्त्रहरण केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन विरोधक टीका करताना दिसत आहेत. आता आज यासह महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडणार यावर आपण लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या अपडेट्स
Mumbai Maharashtra Live Today|अविश्वासदर्शक ठरावावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका आणि महत्त्वाच्या घडामोडी
नवी मुंबई: काही दिवसापूर्वी कळंबोली येथून पुण्याला जाणाऱ्या व्यक्तीने मोबाईल गाडीत विसरला होता. वाहतूक पोलिसांच्या मदतीने गाडी मालकाचा शोध घेत सदर मोबाईल परत मिळवण्यात यश आले होते.
पुणे: चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्यानंतर सात वर्षे रखडलेल्या चांदणी चौकातील पुलाने अवघ्या दहा महिन्यांत उड्डाण घेतले आहे.
देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. काँग्रेसच्या ५५ ते ६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे. असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
अविश्वास ठरावाआधी विधेयक मंजुरीला विरोधकांचा आक्षेप ; दोन दिवसांत सहा विधेयके चर्चेविना मंजूर
महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो केंद्रातला अविश्वास प्रस्ताव. मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यावर सध्या चर्चा सुरु आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून स्वतःचं वस्त्रहरण केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन विरोधक टीका करताना दिसत आहेत. .