Maharashtra Politics News Updates, 12 August 2025 : गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता. मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी पक्षीय कार्यक्रमात बोललो होतो. मला समाज म्हणून पत्र का देता असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी ईव्हीएम हॅक कशी केली जातात हे किरीट सोमय्या दाखवायला घेऊन आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेही हयात होते. आम्ही कुठलेही आरोप हवेत करत नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा असं विधान केलं आहे. यासह महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Mumbai News Live Update “माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच” भास्कर जाधव आक्रमक; यासह महत्त्वाच्या बातम्या

14:43 (IST) 12 Aug 2025

स्पर्धा परीक्षार्थींच्या आत्महत्या का वाढताहेत? शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याच्या आत्महत्येने…

यूपीएससीच्या परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. …सविस्तर बातमी
14:41 (IST) 12 Aug 2025

गाझा येथील नरसंहाराविरुद्ध निदर्शने करण्यास माकपला अखेर परवानगी, २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान निदर्शन

न्यायालयाने माकपला २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यास परवागी दिली. …सविस्तर वाचा
14:41 (IST) 12 Aug 2025

दहिसर पथकर नाका स्थलांतरित करावा – परिवहन मंत्री

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा पथकर नाका शहराच्या आत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा पथकर नाका दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. …वाचा सविस्तर
14:32 (IST) 12 Aug 2025

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले, “अधिकचे दर…”

‘एचएसआरपी’  नंबर प्लेटचे इतर शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक दर का आहेत, असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. …अधिक वाचा
13:59 (IST) 12 Aug 2025

‘डीपीसी’च्या माध्यमातून वाढीव किंमतीने होणाऱ्या खरेदीला चाप; एकूण निधीच्या दहा टक्के निधी खरेदीसाठी वापरण्याचे निर्बंध

बिस्किटे, आहार, स्वयंपाकघरातील वस्तू, खाद्यपदार्थ तसेच बँचेस, खेळणी यासारख्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. त्या वस्तूंची खरेदी चढ्या दराने होत होती तसचे त्याच त्याच वस्तू सातत्याने खरेदी केल्या जात असल्याचे पुढे आले होते. …अधिक वाचा
13:59 (IST) 12 Aug 2025

‘एलिट’ क्लास नव्हे; ते लोकसेवक, देशाचे पहिले माहिती आयुक्त हबिबुल्लाह यांचे अधिकाऱ्यांना खडे बोल

राज्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे लोकशाही नसते,’ असे मत देशाचे पहिले माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह यांनी सोमवारी व्यक्त केले. …वाचा सविस्तर
13:32 (IST) 12 Aug 2025

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची वक्तृत्त्व स्पर्धा वादात

विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेतला, …सविस्तर वाचा
13:12 (IST) 12 Aug 2025

पद्मावती भागात जुगार अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकारी ताब्यात

जुगार अड्ड्यावर भाजपच्या पर्वती मतदारसंघातील पदाधिकाऱ्याला पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली. …अधिक वाचा
12:57 (IST) 12 Aug 2025

रांजणगाव, चाकण ‘एमआयडीसी’तील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमपी’चा प्लॅन… दोन जागांचा आगाऊ ताबा द्यावा

कंपन्यांच्या मदतीसाठी ‘पीएमपी’ने रांजणगाव येथील ३ एकर आणि चाकण परिसरातील २० गुंठे जागेची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव ‘एमआयडीसी’कडे पाठविला आहे. …सविस्तर बातमी
12:38 (IST) 12 Aug 2025

तपासाची चक्रे फिरवताच ४० लाखांचे दागिने मिळाले… आरपीएफ, जीआरपीकडून चोरटे गजाआड

आरोपींनी कबुली दिल्याने आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे किंवा नाही याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे. चोरी गेलेला मुद्देमाल पुन्हा सापडल्याने तक्रारदारांचा जीव भांड्यात पडला. …सविस्तर वाचा
12:24 (IST) 12 Aug 2025

खेडमधील टेम्पोच्या दुर्घटनेप्रकरणी चालक अटकेत; दाटीवाटीने प्रवासी…

टेम्पोचा मालवाहतूक परवाना असतानाही दाटीवाटीने प्रवासी बसविल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला आहे. …अधिक वाचा
12:12 (IST) 12 Aug 2025

‘भविष्यात बांबूला उसाचा भाव….,’ नितीन गडकरी यांचे महत्त्वाचे विधान…

‘पर्यायी इंधनाला चालना देऊनही देशातील जीवाश्म इंधनाची आयात वाढतच असून, देशाची जीवाश्म इंधन आयात शून्य होईल तो देशासाठी मोठा दिवस असेल,’ – नितीन गडकरी सविस्तर वाचा
11:43 (IST) 12 Aug 2025

दृष्टिहीन गोविदांनी चार थर रचून दिली परळच्या लंबोदरला सलामी…

महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक असलेल्या नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाने चार थरांचा मानवी मनोरा रचून परळच्या लंबोदरला सलामी दिली. हा अद्भुत क्षण अनुभवत अनेकांनी दृष्टिहीन गोविदांचे कौतुक केले. …सविस्तर वाचा
11:42 (IST) 12 Aug 2025

बेस्ट बसची मोटारगाडीला धडक; महिलेचा चिरडून मृत्यू

दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर मंगळवारी भीषण अपघात झाला असून बस व मोटरगाडीमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला …सविस्तर वाचा
11:35 (IST) 12 Aug 2025

माझा रोख ब्राह्मण समाजावरच, माफी मागणार नाही-भास्कर जाधव

गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता. मी कुणाचीही माफी मागणार नाही.द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर दुसऱ्यावर फोडायचं. द्वेष पसरवण्याचं काम ब्राह्मण समाजाने केलं आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.

गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली.