Maharashtra Rain News Updates, 18 August 2025 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाच्या ५ हजार कोटी रुपये किमतीच्या जमीनीवरून गंभीर आरोप केले आहे. यावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. याबरोबरच मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टीचीही शक्यता आहे. या पार्शवभूमीवर मुंबई-पुण्यासह राज्यातील पावसासंबंधी तसचे इतर राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.

१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० ते रात्री ११.३० पर्यंत मुंबईत कुठे किती पाऊस झाला? याबद्दल भारतीय हवमान विभागाने दिलेली माहिती–

स्टेशन पाऊस (मिमी)
टाटा पॉवर चेंबूर ९१.५ मिमी
विक्रोळी७८.५ मिमी
जुहू ६० मिमी
सायन ५८.५ मिमी
वांद्रे ५० मिमी
सांताक्रूझ ४७.२ मिमी
कुलाबा २९.० मिमी
Live Updates

Mumbai Breaking News Live Update : राज्यातील पावसासंबंधीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

13:15 (IST) 18 Aug 2025

Shirur Accident Three Died: शिरूर परिसरात अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, दूध वाहतूक करणारा टँकर – ट्रकची समोरासमोर धडक

अपघाताची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
13:12 (IST) 18 Aug 2025

Mumbai Heavy Rain: मुसळधार पावसाने मुंबई लोकलचा वेग मंदावला, अनेक स्थानकात साचले पाणी

Mumbai Heavy Rainfall Alert : मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरा धावत आहेत. या विलंबामुळे रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले आहे.  …सविस्तर वाचा
13:09 (IST) 18 Aug 2025

Vasai Virar Rain News: सलग तिसऱ्या दिवशी वसई विरार शहर जलमय, जनजीवन विस्कळीत

सलग तीन दिवस पाऊस सुरू असल्याने शहरातील गृहसंकुलात ही पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या सामानाची उचल ठेव करावी लागली आहे. …सविस्तर बातमी
12:58 (IST) 18 Aug 2025

Mumbai Heavy Rain Alert शाळेची बस साचलेल्या पाण्यात अडकली मुंबई पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन

माटुंगा पोलिसांच्या हद्दीत साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेले शाळेच्या बसमधील सहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी बस मधून बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणले ही बस डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन प्रतीक्षा नगर येथे जात होती. …वाचा सविस्तर
12:56 (IST) 18 Aug 2025

Uran Rain Updates: उरण मधील अनेक मार्ग पाण्याखाली, शहरातील सखल भागात पाणी

उरण येथील ओएनजीसी प्रकल्प आणि द्रोणागिरी डोंगरातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात नागावमध्ये येत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. …अधिक वाचा
12:40 (IST) 18 Aug 2025

वादळी वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीवर शेकडो मासेमारी बोटी अडकल्या, शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी

एका फेरीसाठी ४ लाखांचा खर्च : मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या एका बोटीसाठी किमान ४ लाख रुपये खर्च येतो. …वाचा सविस्तर
12:35 (IST) 18 Aug 2025

Mumbai Heavy Rain Alert : मुंबईसह ठाणे, पालघरला ‘रेड अलर्ट’

Heavy Rainfall in Maharashtra : दिवसभरात मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून काही भागात कमी वेळात अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाणी साचून वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. …अधिक वाचा
12:34 (IST) 18 Aug 2025

Mumbai Rain Update : मुंबई आणि परिसरात इतका पाऊस का कोसळतोय? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

“आज सकाळपासून मुंबईत संततधार सुरू झाली आहे. यामागचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याबरोबरच सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे, याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणात आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. आज, १८ तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट आहे. उद्यासाठी नॉर्थ कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मच्छिमारांसाठी देखील त्यांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जारी करण्यात आला आहे,” अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.

12:32 (IST) 18 Aug 2025

लहान मुलांमधील मधुमेह वाढतोय! पालकांनो जरा सावधान…

२०२३ च्या अहवालानुसार, भारतात वीस वर्षांखालील तब्बल अडीच लाखाहून अधिक मुले व तरुण टाइप-१ मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्याहून चिंतेची बाब म्हणजे, दरवर्षी १५ ते १८ हजार नवीन बालरुग्णांची या यादीत भर पडत आहे. …सविस्तर वाचा
12:31 (IST) 18 Aug 2025

VIDEO : लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; पशुधनाचे मोठे नुकसान, पिके वाहून गेली

कर्नाटक व सीमाभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला तुफान पूर आला. …सविस्तर वाचा
12:19 (IST) 18 Aug 2025

Mumbai Heavy Rain Alert : दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी

Heavy Rainfall in Maharashtra : मुंबई व आसपासच्या परिसरात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. …सविस्तर वाचा
12:10 (IST) 18 Aug 2025

“राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करा… पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला आहे, धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, हातात आलेले पिक वाहून गेले, होत्याचे नव्हते झाले. या भागात शेतीचे व घराचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत द्या ही सरकारकडे मागणी आहे. मागच्या वेळचे अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत, एकीकडे सरकार कर्ज काढत आहे मग आता शेतकऱ्यांसाठी कर्ज काढावे,त्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, तातडीने निर्णय घ्या,” असे काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार म्हणाले आहेत.

12:04 (IST) 18 Aug 2025

पनवेल: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये सात जखमी

बसथांबा नसताना सुद्धा प्रवासी वाहतूक करणारी बस येथे थांबविण्यात आल्याने हा अपघात झाला. …वाचा सविस्तर
11:56 (IST) 18 Aug 2025

उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे राधाकृष्णन राज्याचे दुसरे राज्यपाल!

राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ३१ जुलै २०२४ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या राज्यपालपदास अलीकडेच एक वर्ष पूर्ण झाले. …सविस्तर बातमी
11:51 (IST) 18 Aug 2025

Video : आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा! मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याला नदीचे स्वरूप

मुंबईत पावासाचा जोर वाढला असून शहरा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यादरम्यान दादरमधील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

11:47 (IST) 18 Aug 2025

मुबईत पावसाचा धुमाकूळ! शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आशिष शेलारांचे आदेश

मुंबईत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहचवा आणि दुपारी ज्या शाळा भरणार आहेत त्यांना सुट्टी जाहीर करा असे आदेश पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहे आहेत.

“मुंबईतील पावसाच्या पार्श्वभीमीवर मी मुंबई महापालिका आयुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे सहआयुक्त यांच्यांशी परिस्थितीतचा आढावा घेण्याबाबत बोललो आहे. मुंबईकरांच्या मदतीसाठी बीएमसी आणि पोलिस हाय अलर्टवर आहेत आणि रस्त्यावर पूर्ण ताकदीने तैनात आहेत.मुंबईकरांच्या मदतीसाठी आपली एसडीआरएफ आणि एनडीआरएफ आपत्ती व्यवस्थपन पथके देखील तैनातीसाठी तयार आहेत. मी परिस्थितीवर कायम लक्ष ठेवून आहे,” अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

11:45 (IST) 18 Aug 2025

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे पोलिसांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दणका!

गेल्या वर्षी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांना दिले होते. श …सविस्तर वाचा
11:37 (IST) 18 Aug 2025

नांदेड : पाणी वाढल्याने रात्र काढावी लागली छतावर

लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर व कर्नाटकातून आलेल्या पावसामुळे रावनगाव, हसना, भासवाडी, भिंगेली ही गावे पाण्याने वेढली आहेत. …अधिक वाचा
11:37 (IST) 18 Aug 2025

घोडबंदर घाट मार्गांवर साचले पाणी, वाहतूक सेवा विस्कळीत

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेना गावापासून पुढे फाउंटन हॉटेल परिसरात रस्त्यावर पाणी साचत असल्याचे समोर आले आहे. …वाचा सविस्तर
11:14 (IST) 18 Aug 2025

मुबईतील पावसाचा वेस्टर्न हायवेवरीव वाहतुकीला फटका

मुंबई शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने विलेपार्लेजवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावल्याचे पाहयला मिळाले.

11:12 (IST) 18 Aug 2025

मुंबईत मुसळधार पाऊस! अनेक भागात रस्ते जलमय

मुसळधार पावसामुळे मुंबई शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. एएनआय वृत्तसंस्थेने सायनच्या गांधी मार्केटमधील रस्त्यावर साचलल्या पाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.