Maharashtra News Highlights 20 August 2025 : मुंबई-पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. इतकेच नाही तर पाऊसामुळे सुमारे १४ लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बुधवारी (२० ऑगस्ट) दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काल मुंबईत दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अनेकजण कार्यालयात पोहोचल्यानंतर सुट्टी जाहीर केल्यामुळे नंतर साचलेल्या पाण्यातून घर गाठावे लागले. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
Mumbai Breaking News Live Update : राज्यभरातील पावसासंबंधी अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
पुण्यात रस्ते गेले पुन्हा खड्ड्यात ! वाहनचालकांची तारांबळ
शिंदे सेनेचे मंत्री भाजप धार्जिणे, आमदाराची भूमिका रोखठोक !
मुंबई आणि उपनगरात आज जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता
मुंबई आणि उपनगरात आज (२० ऑगस्ट २०२५) काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.
भरती – सकाळी १०.१४ वाजता – ४.०२ मीटर
ओहोटी – सायंकाळी ४.१८ वाजता – १.९१ मीटर
भरती – रात्री १०.०३ वाजता – ३.४४ मीटर
ओहोटी – मध्यरात्रीनंतर ४.११ वाजता (उद्या, २१ ऑगस्ट २०२५) ०.८३ मीटर —
पुण्यात प्रशासन अलर्ट मोडवर; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
पुण्यामध्ये खडकवासलाचे पाणी सोडल्याने पातळी वाढत चालली आहे. तेथे जिल्हाधिकारी पीएमसी कमिशनर आणि एनडीआरएफ, एसडीआरएफला अलर्ट राहायला सांगितले आहे. काही भागात पाणी जास्त झाल्याने तेथील लोकांना स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. नदीला खडकवासला धरणाचे पाणी आल्याने त्यामुळे खालचे पूल पाण्याखाली गेले आहेत. कोणीही धोका पत्कारू नये अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबईतील मोनोरेल सेवा पुन्हा सुरू
मुंबईतील मोनोरेलमध्ये काल रात्री काही प्रवासी अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर आज मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. काल मोनोरेल ट्रेन (RST-4) मुंबईतील म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळ भक्ती पार्क आणि चेंबूर दरम्यान अडकली होती. त्यातील सुमारे ५८२ प्रवाशांना चार तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले होते.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Monorail services have resumed after the incident last night, wherein the Monorail train (RST-4) got stuck between Bhakti Park and Chembur, near Mysore Colony station in Mumbai. About 582 passengers onboard were rescued. pic.twitter.com/bQDDinnrDx
— ANI (@ANI) August 20, 2025
Mumbai Weather Updates: मुंबईला सतर्कतेचा इशारा; दिवसभर अतिमुसळधार पाऊस, जिल्ह्यातील ‘या’ भागात आज ‘रेड अलर्ट’
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह ‘बेस्ट’ वाहतूक सुरळीतपणे सुरु – बीएमसी
बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह ‘बेस्ट’ वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on field) अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने सोशल मीडियावरून दिली आहे.
?️बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 20, 2025
?सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट'…
Mumbai Rain Update: मुंबई आणि परिसरात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा वाहतूकीला फटका बसला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याच्या पाहायला मिळाले.
Mumbai, Maharashtra: Heavy traffic was reported on the Western Express Highway pic.twitter.com/Ddq2GAxNVZ
— IANS (@ians_india) August 20, 2025