Mumbai Maharashtra Breaking News Updates : राज्यात एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दुसरीकडे विविध मंत्र्यांवरील आरोप समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (४ मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद सोडल्याचे वृत्त आहे. तसंच, संजय राऊत यांनी आज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिला विनयभंग प्रकरणी मोठा आरोप केला आहे. विरोधकांनी या अधिवेशनात मंत्र्यांना घेरण्याची रणनीती आखल्याचं म्हटलं जातंय. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Live News Update Today, 05 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
आरोपीने शौचासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला एकटी गाठून फरफटत नेले, अमानुष मारहाण केली व नंतर अत्याचार केला.
Maharashtra Live News : “वडिलांचं अस्थी विसर्जनही करू दिलं नाही अन्…”, विनयभंगाचा आरोप असलेले जयकुमार गोरे यांची पहिली प्रतिक्रिया
माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांनी मला वाढवून संघर्ष करून इथपर्यंत आणलं. त्यांचं अस्थीविसर्जनही करू दिलं नाही. इथपर्यंत राजकारण करावं असं मला अपेक्षित नव्हतं. हे प्रकरण २०१७ सालचं असून २०१९ मध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे – जयकुमार गोरे
“मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवले”, अंबादास दानवे यांची माहिती
जयकुमार गोरे यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा विषय आम्ही सभागृहात सरकारसमोर मांडू – अंबादास दानवे</p>
जयकुमार गोरेंप्रकरणी अंजली दमानिया आक्रमक, राज्यपालांची घेणार भेट
राज्यपालांना पत्र देऊन मी मागणी करणार आहे. हे तातडीने झालं पाहिजे. अशी विचित्र, विकृत माणसांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पाहिजे. इतके अत्याचार होत असताना अत्याचार मंत्री आपल्याकडे कशाला हवा – अंजली दमानिया
“स्वारगेटसारखा प्रकार जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय”, महिला विनयभंगप्रकरणी संजय राऊतांचा मोठा आरोप!
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यमंत्रीमंडळातील आणखी एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा थेट उल्लेख करून त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजाणतेपणातून…”
धनंजय मुंडे यांच्याविषयीचं माझं वक्तव्य हे अजाणतेपणातून होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आले, तेव्हा त्यांनी जाण करून दिली. तेव्हा या क्रूरतेची जाणीव झाली. तेव्हा माझंही अंतःकरण दुखावलं. न्यायालयाला मी प्रार्थना करतो की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. भगवान गड नेहमीच पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे – नामदेव शास्त्री
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
Maharashtra Live News Update Today, 05 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा