Latest Marathi News Updates : राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नते आदित्य ठाकरे यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. दुसरीकडे औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा देखील तापलेलं असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातही पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पुण्यातील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी मिनी बसनं अचानक पेट घेतल्याच्या प्रकरण समोर आले होते. या घटनेच चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले होते, मात्र या प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून चालकानेच वैयक्तिक रागातून बस पेटवून दिल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील या आणि इतर राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेट आपण येथे वाचू शकता.

Live Updates

Maharashtra News Live Today, 21 March 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर….

13:14 (IST) 21 Mar 2025

“न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल…”, जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट चर्चेत

“परभणी ……. एक होतकरू आणि तरुण मुलगा परिस्थितीशी झगडत कायदयाचे शिक्षण घेत पीडितांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असतो ….. त्याला अन्याय सहन होत नसतो त्याविरोधात उद्रेकात तो शामिल होतो …. पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात……. न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याच दिवशी त्याच्या तुरुंगात मृत्यू होतो…. तो तरुण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी …. सरकार छाती ठोकपणे म्हणते मृत्यू मलटीपल शॉक मुळे झाला…… मला आधीपासून ह्यात संशय होता हे जवळपास अशक्य होते… पोस्ट मार्टम मध्ये सर्व क्लिअर होते तरीहीसरकार ऐकत नव्हते कुणालातरी वाचवत होते….. आज दंडाधिकारी अहवालात हे स्पष्ट झाले कि हा मृत्यू नव्हता तर हत्या होती क्रूर हत्या.. त्यांनी तैनात पोलिसांना दोष दिला आहे…. एक इन्स्टिट्यूशनल मर्डर….. मी मनापासून सलाम करतो सोमनाथ च्या आईला……..जिने स्वाभिमानाने तुटपुंजी मदत नाकारली तिने स्पष्टपणे सांगितले मला माझा सोमनाथ हवा……. मी दुःखद अंतकरणाने सांगतोय सोमनाथ तर मी आणू शकत नाही, ती ताकद भगवंताने मला दिली नाही पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल हा जितेंद्र आव्हाडचा आईला शब्द आहे……… “, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर लिहीली आहे.

12:16 (IST) 21 Mar 2025
विधान परिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशानात विधान परिषदेवर निवडून आलेल्या पाच सदस्यांचा आज शपथविधी पार पडला. यावेळी चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केनेकर, संजय खोडके, संदीप जोशी यांनी सदस्यपदाची शपथ घेतली.

11:58 (IST) 21 Mar 2025

सैलानी बाबांची संदल मिरवणूक; शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनाने सुरुवात झालीय. जवळपास महिनाभर चालणाऱ्या यात्रेचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण हे सैलानी बाबांची संदल मिरवणूक असते. संदल मिरवणूक ची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांच्या दर्गाहवर संदल चढविण्यात आला. या वेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर उपस्थितीत भाविकांनी संदल चे मनोभावे दर्शन घेतले.

11:09 (IST) 21 Mar 2025
पनवेल-सायन मार्गांवर कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पनवेल-सायन मार्गांवर कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम जवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरनेरुळ एल. पी. ब्रिज ते बेलापूरच्या दिशेने वाहनाच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आङेत. कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

10:35 (IST) 21 Mar 2025

बिहार आणि मुंबईच्या निवडणुकींसाठी सुशांत सिंहचा मुद्दा तापवला जातोय, रोहित पवारांचा भाजपावर आरोप

भाजपाकडून फक्त बिहार आणि मुंबईच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा तापवला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.

10:28 (IST) 21 Mar 2025

नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस दल अलर्ट मोडवर

औरंगजेबच्या कबरीवरून सध्या राज्यभरात वातावरण तापलेले असून, नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातही पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शहरात ३०० अधिकाऱ्यांसह सुमारे ३ हजार पोलिसांचा तर ग्रामीण भागात अडीचशे अधिकाऱ्यांसह २ हजार पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला.

नागपूर मध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला आहे तर वाहनांची तोडफोड, वाहने पेटवून देणे, दगडफेक अशा घटना घडल्या. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून वेगवेगळ्या भागांत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra News Live Today, 21 March 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर….