Marathi News Updates : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (सोमवारी) दुपारी २ वाजता विधानसभेत राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँगेस सोडण्याबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर धंगेकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत.
Maharashtra Live News Update Today, 10 March 2025 : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
“ते खरं ते बोलले” गंगेच्या पाण्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांचा राज ठाकरेंना पाठिंबा
“ते खरं बोलले, त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही. मी देखील जाऊन आलो. इतके लोक आल्यानंतर पाणी खूप अस्वच्छ झालं होतं. पाण्यात उभे राहण्याची देखील इच्छा होत नव्हती. जे काही म्हणाले ते सत्य आहे आणि खऱ्याला खरे मानून पुढे गेले पाहिजे. आजकाल राज ठाकरे खरं बोलत आहेत याचं आम्हाला आनंद आहे.”
“इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?” जितेंद्र आव्हाडांची खोचक टिप्पणी
काँग्रेसचे नेते रविद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. “चंत्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar? कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का”, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
चंत्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 10, 2025
कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का
Maharashtra Live Update