Petrol and diesel prices on 2 June: दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या जातात. आता जून महिना सुरु झाला आहे. तर आजचे दर सुद्धा सकाळीच जाहीर झाले आहेत. त्यामुळे आज मुंबई-पुणे या शहरांसह महाराष्ट्रातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचा दर काय असणार आहे हे या लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.५८९१.१२
अमरावती१०५.०६९१.५८
औरंगाबाद१०४.४७९०.९९
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.६८९२.१७
बुलढाणा१०४.८१९१.३४
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०५.२४९१.७६
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.८२९१.३६
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९४९०.५१
नांदेड१०६.००९२.५९
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.३३९१.८३
पालघर१०४.०१९०.४४
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.६४९२.१४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०५.१०९१.५९
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.४९९१.०३
ठाणे१०४.२८९२.२२
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.६५९१.१९
यवतमाळ१०४.८७९१.४०

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झालेला दिसून आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील धुळे शहरांत गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच ३१ मे २०२४ ला पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये प्रति लिटर होती ; जी आज १०४. १० रुपये प्रति लिटर झाली आहे. तर जळगावमध्ये देखील १०४.३५ रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आजच्या तारखेला १०५. २४ रुपये प्रति लिटर झाली आहे. तसेच नागपूर आणि पालघरमध्ये मात्र पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

तर महाराष्ट्रातील जळगाव या शहरांत डिझेलची किंमत ३१ मे २०२४ रोजी ९०.८८ रुपये प्रति लिटर होती ; जी आजच्या तारखेला ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे.तर सोलापूर शहरात ३१ मे २०२४ ला डिझेलची किंमत ९०.८२ रुपये प्रति लिटर होती ; जी आजच्या तारखेला ९१.०३ रुपये प्रति लिटर आहे. तसेच लातूर शहरातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण येथे डिझेलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी लातूर शहरांत डिझेलच्या किंमत ९२.१८ रुपये प्रति लिटर होती ; जी आज ९१.६७ रुपये प्रति लिटर आहे.

त्यातच शुक्रवारपासून जम्बो मेगाब्लॉक सुरु झाला होता ; जो आज आज रविवारपर्यंत असणार आहे. यामुळे अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे काही जण फिरायला जाण्याचाही प्लॅन करतील. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या गाडीची टाकी फूल करण्यापूर्वी तुमच्या शहरात आज काय सुरु आहे दर हे नक्की तपासून घ्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra petrol and diesel price today 2nd june 2024 mumbai pune remained unchanged check fuel rates in your city below table asp