Maharashtra Political Crisis Updates, Eknath Shinde Oath Ceremony : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (३० जून) बहुमताच्या चाचणीसाठी बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द केलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी घोषित केले आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले जाणार आहे. भाजपाने शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट…
Maharashtra Political Crisis Live : एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा; वाचा प्रत्येक अपडेट…
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे देंवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्याआधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
काँग्रेस नेत्यांकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, बाळासाहेब थोरात, पृथ्वाराज चव्हाण, नाना पटोले, सुनील केदार इत्यादी नेते उपस्थित
एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, मंगलप्रभात लोढाही शिंदेंसोबत हजर, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही विमानतळावर उपस्थित
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याआधी गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.
दीपक केसरकर म्हणाले, “मला विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या १६ आमदारांचं काय होईल? त्यावर मी सांगितलं आहे की ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावं लागतं. आम्ही विधीमंडळात आमचा पक्षाची नोंदणी केली तेव्हा आम्ही आमच्या आमदारांच्या स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे १६ आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्या १६ आमदारांना देखील बंधनकारक राहील. आम्ही त्यांना आमच्यासोबत चला असा म्हणणार नाही.”
दीपक केसरकर म्हणाले, “पक्षांतर बंदी कायदा विधीमंडळात काय कृती करता यावर लागू होतो. व्हिपने हजर राहण्यास सांगितलं, मतदान करायला सांगितलं तर तसं करावं लागतं. कायद्यात 'ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस' असं स्पष्ट म्हटलं आहे. पक्षाची घटना बंधनकारक आहे अशी जनतेची दिशाभूल केली जात आहे. देशाची घटनाच अंतिम आहे असे न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याला डावलून इतर कोणतीही घटना काम करू शकत नाही.”
“कायद्यात काही तरतूद असेल तर त्याला पक्षाची घटना डावलू शकत नाही. कारण पक्षाची घटना पक्ष ठरवतो. विधीमंडळात आपली लिखित घटना चालते. त्यापलिकडे कुणी जाऊ शकत नाही,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले असं नाही. ते महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा करण्यासाठी गेले आहेत. दोन्ही पक्ष मिळून जो निर्णय घेतील त्यात आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असू : दीपक केसरकर
आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे. : दीपक केसरकर
राज ठाकरे म्हणाले, “एखादा माणूस ज्या दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.”
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
दीपक केसरकर म्हणाले, “आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात.”
एकनाथ शिंदे एकवचनी आहेत, त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता, त्यामुळे हा शब्द फिरवणं शक्य नव्हतं, दीपक केसरकर यांची माहिती
भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलून निर्णय घेतील. अद्याप कोणत्याही मंत्र्याची नावं ठरलेली नाही. येथे असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत : दीपक केसरकर
बैठकीत आमदारांनी गटनेतेपदी माझी निवड केली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याचा आम्हाला आनंद नाही. ती परिस्थिती उद्भवली होती. आम्ही ५० आमदारांनी केवळ हिंदुत्व आणि मतदारसंघातील कामांसाठी ही भूमिका घेतली. उद्धव ठाकरे आजही आमचे नेते आहेत : एकनाथ शिंदे
दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर सेलिब्रेशन सुरू असल्याचं बोललं जातंय, मात्र इथं कुणीही उत्सव साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. आमचा बंड आघाडीविरोधात होता. उद्धव ठाकरेंचं मन दुखावं हा हेतू नव्हता.”
देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर भाजपाची बैठक सुरू, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित
चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मविआ सरकार बरखास्त झालं. अडीच वर्षांत मविआ सरकारच्या कारभाराबद्दल जनतेमध्ये सर्वच स्तरांमध्ये रोष होता. त्यामुळे हे सरकार पायउतार झाल्यानं जो आनंद झाला, तो आमच्या महिला आमदारांनी मला भेटून व्यक्त केला.”
उद्धवजी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मविआ सरकार बरखास्त झालं. अडीच वर्षांत मविआ सरकारच्या कारभाराबद्दल जनतेमध्ये सर्वच स्तरांमध्ये रोष होता. त्यामुळे हे सरकार पायउतार झाल्यानं जो आनंद झाला, तो आमच्या महिला आमदारांनी मला भेटून व्यक्त केला. pic.twitter.com/jnLKF53d8h
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 30, 2022
बैठकीनंतर काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर, विरोधी बाकावर बसण्याची तयार असल्याचं वक्तव्य, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे यशस्वीपणे सरकार चालवल्याचंही केलं नमूद
राज्यात भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्यानंतर खासदार उदयनराजे साताऱ्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. नव्या मंत्रीमंडळात वाटा असावा यासाठीच उदयनराजे भोसले मुंबईला गेल्याची सूत्रांची माहिती
आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या ट्वीटवर प्रत्युत्तर दिलंय. यात नितेश राणे यांनी 'रिटर्न गिफ्ट' असा खोचक टोला लगावला.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 30, 2022
उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनाना द्यायला हवा होता असं स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे. आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही असंही ते म्हणाले आहेत.
“सुप्रीम कोर्टाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. ही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा नव्हती,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.”
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
मविआसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, आज त्यावर बोलणं योग्य नाही, आम्ही चर्चा करून ठरवू, नामांतरावरून काही वाद नाही, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा, आईव्ह अपडेट
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. या प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट…