रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी अशा महायुतीमार्फतच लढवल्या जाणारा आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ही निवडणूक लढवली जाईल आणि जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हाप्रमुख राहुल पंडीत म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाकडून होणा-या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विकासासाठी मोठा निधी आणला आहे. यातून विकास कामे करण्यात आली आहे. त्यामूळे येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेलाच किंबहुना महायुतिलाच बहुमत मिळले असा विश्वास पंडीत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

जिल्हात महायुती म्हणूनच निवडणूका लढविल्या जाणार असल्याचे एकमत जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिका-यांमध्ये झाले असलाचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये कोणाला उमेदवारी देण्यात येणार या बाबत आमदार कीरण सामंत यांच्यासह पक्षाचे वरिष्ट नेते निर्णय घेतील असे ही राहुल पंडीत यांनी सांगितले.