कराड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे भव्य महारक्तदान संकल्प अभियान राबवण्यात आले. त्यास रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर ‘महारक्तदान अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ३३ मंडलांमध्ये महारक्तदान शिबिरे आयोजिली होती. कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड शहर, कराड दक्षिण मध्य, कराड दक्षिण पूर्व आणि कराड दक्षिण पश्चिम अशा चार मंडलांचे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात अनेकांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
या अभियानासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कराडचे कृष्णा रुग्णालय, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक आणि महालक्ष्मी ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, राज्य कार्यकारिणी सदस्य स्वाती पिसाळ, भारत जंत्रे, धनाजी माने, गिरीश शहा, रमेश मोहिते, रमेश लवटे, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर ‘महारक्तदान अभियान’ राबविले जात आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ३३ मंडलांमध्ये महारक्तदान शिबिरे आयोजिली होती. कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड शहर, कराड दक्षिण मध्य, कराड दक्षिण पूर्व आणि कराड दक्षिण पश्चिम अशा चार मंडलांचे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.