गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मविआचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात नवीन सराकर आलं. सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप सविस्तर अशी भूमिका जाहीर केलेली नाही. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून त्या दिवशी राज ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. वर्धापन दिनाचा टीजर मनसेकडून लाँच करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी टीजर नाही, थेट चित्रपट दाखवणार”

एकीकडे राज ठाकरेंच्या भूमिकेची सगळ्यांनाच उत्सुकता असताना खुद्द त्यांनी मात्र मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पनवेलमध्ये झालेल्या जाहीर मुलाखतीमध्ये आपण कोणताही टीजर किंवा ट्रेलर न दाखवता थेट २२ तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी सिनेमा दाखवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे गुढी पाडव्याला बोलणार असल्याचे संकेत त्यातून मिळाले असले, तरी त्याआधी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

“प्रतीक्षा नऊ मार्चची!”

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वर्धापन दिनाच्या टीजरचा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे. त्यावर “प्रतीक्षा नऊ मार्चची” असंही त्यांनी लिहिलं आहे.

राज ठाकरे म्हणतात, “दिवस-रात्र आम्ही बरनॉल लावत…”; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर टोला! आमदार राजू पाटलांचा केला उल्लेख

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य सुरुवातीला ऐकायला मिळत आहेत. त्या राज ठाकरे “महाराष्ट्र लढवय्या आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल”, असं बोलताना दिसत आहेत. त्यासोबतच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही त्या टीजरमध्ये दिसत आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंवरही आणखीन जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आगामी महानगर पालिका निवडणुकांमध्ये मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार? याविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात असून त्यावर राज ठाकरे ९ मार्च रोजी भाष्य करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns teaser for anniversary sandeep deshpande share raj thackeray statement pmw