राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी दिली होती. त्यानंतर आत आज ( १२ जून ) पक्षाच्या खजिनदार पदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांनी सुनिल तटकरे यांच्या नियुक्तीचं पत्र जारी केलं आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच आता खजिनदार पदाचीही जबाबदारी सुनिल तटकरे यांच्यावर टाकली आहे.

हेही वाचा : VIDEO : “मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा…”, नारायण राणेंचा मोठा दावा

“लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे नियुक्ती”

सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यावर शरद पवारांनी सांगितलं की, ” सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी लोकांची मागणी होती. लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.”

हेही वाचा : “७०० एकर जमीन कुठून आणली”, खैरेंच्या विधानावर संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“लोकांना परिवर्तन हवं”

“सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढावी म्हणून हा बदल करण्यात आला. लोकांना परिवर्तन हवं आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sunil tatkare new responsibility ncp treasure by sharad pawar ssa