भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवली. पंढरपूर येथे जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, मोदी हे चहा विकत होते हे गेले अनेक दिवस आपण ऐकत आलो पण आता ते रेल्वेच्या डब्यात चहा विकत होते असे सांगितले जात आहे, थापा मारायलाही काही मर्यादा असतात. मोदी मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्यापेक्षाही जास्त थापा मारत आहेत.
गुजरातमध्ये गेलो असताना मोदी चहा विकत होते याची कबुली कोणीही दिली नाही असे सांगून ते म्हणाले की, गोध्राकांडानुंतर मोदींना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते पण त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपये यांच्या आदेशाचेही पालन केले नाही, त्यामुळे त्यांना सत्ता प्रिय आहे हेच दिसून येते.
  संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2014 रोजी प्रकाशित  
 मोदी हे दादा कोंडकेंपेक्षाही थापाडे-सुशीलकुमार शिंदे
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवली. पंढरपूर येथे जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
  First published on:  14-04-2014 at 02:40 IST  
TOPICSकाँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiनिवडणूक २०२५Election 2025भारतीय जनता पार्टीBJPसुशीलकुमार शिंदेSushilkumar ShindeसोलापूरSolapur
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi liar than dada kondke sushilkumar shinde